प्रेम, शांतता आणि मैत्रीसाठी एकत्र येण्याचा संदेश !

संगमनेरात अभिनव कार्यक्रम
प्रतिनिधी —
१ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संगमनेरमधे पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून आणि हातात पांढरे कागद घेऊन कार्यकर्त्यांनी आपली अस्वस्थता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून प्रकट केली.
शहरातील नगररोड येथील गांधी प्रतिमेसमोर कार्यकर्ते जमले होते. सध्या देशात महागाई प्रचंड वाढली आहे. तरुणांमध्ये बेरोजगारी वाढली आहे. महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्यासारख्या महत्वाच्या प्रश्नांवरून लोकांचे लक्ष उडवण्यासाठी धर्माच्या नावाने तरुणांची डोकी भडकवली जात आहेत. धर्माच्या नावाने माणसा माणसांमध्ये द्वेष पसरवला जात आहे. या भीषण स्थितीविषयी अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी ही मंडळी जमली होती. या कार्यक्रमात कोणतेही भाषणे, घोषणा, गाणी नव्हती.
ॲड. निशा शिवूरकर, पुष्पा निऱ्हाळी, ॲड. ज्ञानदेव सहाणे, डॉ. अमित शिंदे, सीमा मालानी, ॲड. कय्युम शेख,ॲड. अनिल शिंदे, डॉ. इरफान अली, अनिल गुंजाळ, शांताराम गोसावी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
