स्थानिक गुन्हे शाखेचा संगमनेरात छापा !

तिरट जुगार खेळणाऱ्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी —

बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शहरातून जाणाऱ्या पुणे नाशिक महामार्गावरील हॉटेल रॉक अँण्ड रोलच्या आडोशाला तीन पत्ती तिरट जुगार खेळणाऱ्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सुमारे ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अनिल एकनाथ राक्षे, रा. संगमनेर खुर्द, रवींद्र श्रीधर रूपवते, रा. साईनगर, रावसाहेब इंगळे, रा. जोर्वे, लक्ष्मण बाळासाहेब जगताप, रा. जोर्वे मोहम्मद हुसेन सय्यद, रा. खांडगाव, शुभम गोपाल शाहू, रा. साईनगर, सोमनाथ शंकर राहणे, रा. जाखुरी, बाळासाहेब भिकाजी मांडे, रा. जाखूरी अशी आरोपींची नावे आहेत.

पोलीस नाईक सचिन दत्तात्रेय हडबल नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

या जुगार खेळणाऱ्या आरोपींकडून पोलिसांनी मोबाईल, पत्ते, रोख रक्कम असा एकूण ५६ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!