महीलादिना निमित्ताने जि.प.शाळा. व अंगणवाडी च्या वतिने महीलां पालकांच्या खेळाच्या स्पर्धा

प्रतिनिधी —

जिल्हा परिषद शाहूनगर शाळा, नाईकवाडीनगर ( शाहूनगर २) अंगणवाडी व मराठी मुलां मुलीची शाळा यांनी आज जागतिक महिला दिना निमित्ताने आयोजित केलेल्या महीला पालकांच्या विविध खेळांच्या स्पर्धा पार पडल्या.

यावेळी विजेत्यांना पैठणी, मोठा डबा व परात अशी बक्षिसे नगरसेविका तमन्ना मिसिन शेख व जनाबाई नवनाथ मोहिते यांच्या हस्ते देण्यात आले.

आज जागतिक महिला दिनानिमित्ताने जिल्हा परिषद गट शिक्षणाधिकारी जालिंदर खताळ, एकात्मिक बालविकास प्रकल्पाधिकारी हरिभाऊ हाके यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप कार्यक्रम अंतर्गत महिला नोंदणी वाढवण्यासाठी महिलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

अकोलेतील शासकीय विश्रामगृह येथे संगीत खुर्ची, चमचा लिंबू, फुगे फोडणे, धान्य निवडणे, बादलीत चेंडू टाकणे यास्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे उदघाटन अकोले नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जेष्ठ विधीतज्ञ ॲड.मंगल हांडे यांनी महिलादिना निमित्ताने मनोगत व्यक्त करुन सर्वाना शुभेच्छा दिल्या.

महीला दिनानिमित्ताने आयोजित हि स्पर्धा अतिशय उत्साहात संपन्न झाली. यास्पर्धेत जि.प. शाळा, अंगणवाडीतील मुला मुलीच्या पालकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोदविला. याप्रसंगी झालेल्या स्पर्धेत, संगीत खुर्ची मध्ये प्रथम क्रमांक अनिता शरद पवाार, द्वितीय योगिता दत्तात्रय वाकचाैरे, तृतीय कोमल पवार यांनी तर लिंबु चमचा स्पर्धेत- प्रथम क्रमांक विशाखा जाधव, द्वितीय रिंकु अवचिते, तृतीय शारदा शिंदे, फुगे फोडणे स्पर्धेत –प्रथम क्रमांक पूजा मोहिते, द्वितीय काजल मोहिते, वनिता मोहिते, धान्य निवडणे –प्रथम क्रमांक मनिषा देवकर, द्वितीय सुरेखा बलसाणे, तृतीय कविता वायदांडे, बादलीत चेंडू टाकणे – प्रथम क्रमांक आसमा पठाण, द्वितीय मोनिका साबळे, तृतीय क्रमांक सुलताना शेख यांनी स्पर्धेत यश मिळवले.

सकाळपासून सुरू असलेल्या स्पर्धेचा दुपारी बक्षीस वितरण नगरसेविका तमन्ना मोहसिन शेख, जनाबाई नवनाथ मोहिते व अंगणवाडी सेविका आशा शिंदे यांचे हस्ते करण्यात आले. प्रथम क्रमांक विजेत्यांना पैठणी, द्वितीय क्रमांक मोठा डबा तर तृतीय क्रमांकाला परात बक्षीस म्हणून देण्यात आले. या स्पर्धेसाठीच्या बक्षीसास नगरसेविका जनाबाई मोहिते, तमन्ना मोहसिन शेख व विश्रामगृहाचे चाैकीदार बाळासाहेब चाैधरी हे प्रायोजक होते.

ही स्पर्धा यशस्वीतेसाठी शिक्षक मारूती बांगर, कृष्णा साबळे, वसंत आहेर, गिरी मॅडम, अनिता डावरे, आशा शिंदे, अनिता सुकटे, अनिल रोकडे, रिंकु अवचिते, पल्लवी अवचिते आदिंनी मेहनत घेतली.  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आशा शिंदे यांनी केले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!