गुटखा-मावा विक्रेत्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची जोरदार मोहीम
अकोले, राजूर, कर्जत, श्रीरामपूर व श्रीगोंदा येथे एकाच वेळी १० छापे ; २० आरोपींविरुद्ध १० गुन्हे दाखल, २ लाख ७६ हजार ८९६ रुपयांचा मुद्देमाल जप्त
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध गुटखा, मावा व सुगंधित तंबाखू विक्रेत्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने जोरदार मोहीम राबवित अकोले, राजूर, कर्जत, श्रीरामपूर शहर आणि श्रीगोंदा पोलीस ठाणे हद्दीत एकाच वेळी १० ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. दिनांक ४ व ५ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत २० आरोपींविरुद्ध १० गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण २ लाख ७६ हजार ८९६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संतोष मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक संदिप दरवडे तसेच पोलीस अंमलदार विजय ठोंबरे, संतोष खैरे, गणेश लोंढे, राहुल डोके, अमृत आढाव, योगेश कर्डीले, भगवान धुळे, अरूण गांगुर्डे, शामसुंदर जाधव, रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, अभिजीत अरकल, दिपक जाधव, रमीजराजा आतार, आजिनाथ पाखरे, विशाल तनपुरे, निळकंठ कारखेले, प्रताप देवकाते, सुनिल मालणकर, सागर ससाणे, किशोर शिरसाठ व अमोल कोतकर यांची पाच पथके तयार केली.
या पथकांना जिल्ह्यातील अवैध गुटखा, मावा व सुगंधित तंबाखू व्यावसायिकांची माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.

अकोले येथे कारवाई
अकोले पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ५४२/२०२६, बीएनएस कलम १२३, २२३, २७४, २७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत ३५,१४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी :
1. उल्हास रामदास वाकचौरे, वय ३६, रा. निंब्रळ, ता. अकोले, जि. अहिल्यानगर.
2. दिवटे किराणा दुकानाचे चालक व मालक, रा. शिवाजी महाराज चौक, गणपती मंदिराजवळ, घोटी, नाशिक — फरार.
राजूर येथे दोन ठिकाणी कारवाई
राजूर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक २७३/२०२६, बीएनएस कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून १२,६७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी :
1. अन्वर लियाकत तांबोळी, वय २८, रा. राजूर, ता. अकोले, जि. अहिल्यानगर.
2. मुबारक लियाकत तांबोळी, रा. राजूर, ता. अकोले, जि. अहिल्यानगर — फरार.
3. रोशन कैलास रोकडे, वय २८, रा. राजूर, ता. अकोले.
तर राजूर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक २७४/२०२६, बीएनएस कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) अन्वये दुसरा गुन्हा दाखल करून २,६३८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी :
1. अमन शमशुद्दीन तांबोळी, वय २८, रा. तांबोळी गल्ली, राजूर, ता. अकोले, जि. अहिल्यानगर.
2. सोनु दिलीप मुर्तडक, रा. राजूर, ता. अकोले — फरार.

कर्जत येथे तीन ठिकाणी छापे
कर्जत पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ४९७/२०२६, बीएनएस कलम १२३, २२३, २७४, २७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ४,०२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी :
1. हुजेर मुसा काझी, वय ४०, रा. लांगोरे गल्ली, कर्जत, ता. कर्जत.
2. सोनु, पूर्ण नाव माहित नाही, रा. आष्टी, जि. बीड.
कर्जत पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ४९५/२०२६, बीएनएस कलम १२३, २२३, २७४, २७५ अन्वये दाखल गुन्ह्यात १०,७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी :
1. सुहास सतीश सुपेकर, वय ३४, रा. कुळधरण, कर्जत, ता. कर्जत.
कर्जत पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ४९६/२०२६, बीएनएस कलम १२३, २२३, २७४, २७५ अन्वये दाखल गुन्ह्यात ३५,९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी :
1. शकील अजीज अतार, वय ५२, रा. कुळधरण, कर्जत, ता. कर्जत.
2. जुनेद खान, पूर्ण नाव माहित नाही, रा. अहिल्यानगर — फरार.

श्रीरामपूर शहरात दोन ठिकाणी कारवाई
श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ८६८/२०२६, बीएनएस कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करून ८५,३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी :
1. मोहमंद अहमद हसन सय्यद, वय २६, रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर.
2. इलीयास युसूफ शेख उर्फ खान साहब, रा. श्रीरामपूर — फरार.
तर श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ८६७/२०२६, बीएनएस कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) अन्वये दाखल गुन्ह्यात ३,१४४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी :
1. नाजीम हारूण सय्यद, वय २४, रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर.

श्रीगोंदा येथे दोन ठिकाणी छापे
श्रीगोंदा पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ७९७/२०२६, बीएनएस कलम १२३, २२३, २७४, २७५ अन्वये गुन्हा दाखल करून १४,१०४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी :
1. सतीष शिवाजी खामकर, वय ४३, रा. टाकळी कडेवाडी, ता. श्रीगोंदा.
2. अमर कांबळे, पूर्ण नाव माहित नाही, रा. राशीन, ता. कर्जत — फरार.
तसेच श्रीगोंदा पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ७९८/२०२६, बीएनएस कलम १२३, २२३, २७४, २७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ७३,२८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी :
1. महेश सर्जेराव गलांडे, वय ३३, रा. देऊळगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर.
2. शोएब राजू तांबोळी, वय २६, रा. झेंडा चौक, श्रीगोंदा.
3. फरहान रहमान व्यापारी, रा. श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा — फरार.
एकूण २ लाख ७६ हजार ८९६ रुपयांचा मुद्देमाल जप्त
या संपूर्ण कारवाईत अकोले, राजूर, कर्जत, श्रीरामपूर शहर आणि श्रीगोंदा पोलीस ठाणे हद्दीत १० वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. २० आरोपींवि
रुद्ध १० गुन्हे दाखल करून एकूण २ लाख ७६ हजार ८९६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
