तोतया पोलिसाला पकडले ..! एक जण पसार..

आरोपीवर संगमनेरसह इतर ठिकाणी तब्बल 125 गुन्हे दाखल…

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क 

पोलीस असल्याची बतावणी करुन नागरीकांची फसवणुक करुन चोरी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे.

1) सज्जाद गरीब शहा इराणी (वय- 47 वर्षे रा. इराणी गल्ली, वार्ड नं.1 श्रीरामपुर) यास अटक करण्यात आले असून त्याचा चुलत भाऊ 2) मुस्लीम यासीन इराणी (रा. इराणी गल्ली, वार्ड नं.1 श्रीरामपुर(फरार) आहे.

फिर्यादी रविंद्र नारायण राजहंस (रा. प्लॉट नं.31 सर्वे नं.27/1 क अशोकनगर सावेडी, अहिल्यानगर) हे एका बंगल्या समोर जॉगिंग पार्क जवळ सावेडी येथे फोन करण्यासाठी गाडीवर थांबलेले असतांना तेथे मोटार सायकलवर डोक्यात हेल्मेट घातलेला आरोपी व त्याचा चुलत भाऊ या दोघांनी संगणमत करुन फिर्यादी यांना पोलीस असल्याचे भासवून पत्ता विचारण्याच्या कारण दाखवून, पोलीस असल्याचे आय कार्ड दाखवीत फिर्यादीच्या खिशातील मोबाईल, सुट्टै पैशाची चिल्लर व हातातील सोन्याच्या दोन व तांब्याच्या दोन अंगठ्या लंपास करून फिर्यादीची फसवणूक केली. 

किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार राहुल द्वारके, फुरकान शेख, भिमराज खर्से, रिचर्ड गायकवाड, राहुल डोके, सुनिल मालणकर, भगवान थोरात, सतिष भवर, चालक उत्तरेश्वर मोराळे यांचे पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्या बाबत सुचना व मार्गदर्शन करुन रवाना केले.

पथकाने वरील गुन्ह्यातील आरोपीबाबत माहिती काढत असतांना पथकास सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी सज्जाद गरीब शहा इराणी याने व साथीदारासह केला असून तो गोविंदपुरा नाका, भिंगार परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. सदर माहिती नुसार पथकाने गोविंदपुरा नाका, भिंगार परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. 

संगमनेर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं.584/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 204, 318(4), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची निष्पन्न झाले आहे.

आरोपी नामे सज्जाद गरीब शहा इराणी याचेविरुध्द यापुर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

अ.नं. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

1 काळाचौकी जि.मुंबई गु.र.नं.389/2025 बी.एन.एस.कलम 316,318,3(5)

2 रामानंद जि.जळगाव गु.र.नं.344/2025 बी.एन.एस.कलम 303(2)

3 सांगवी, पिंपरी चिंचवड गु.र.नं.36/2014 

4 भोसरी, पिंपरी पिंचवड गु.र.नं. 14/2014

5 सांगवी, पिंपरी चिंचवड गु.र.नं. 103/2024

6 चिंचवड, पिंपरी चिंचवड गु.र.नं. 06/2014

7 सांगवी, पिपरी चिंचवड गु.र.नं.95/2014

8 निगडी, पिंपरी चिंचवड गु.र.नं. 90/2014

9 सांगवी, पिंपरी चिंचवड गु.र.नं. 97/2014

10 निगडी, पिंपरी चिंचवड गु.र.नं. 184/2014

11 वारजेमाळवाडी, पुणे शह गु.र.नं. 291/2013

12 हडपर, पुणे शहर गु.र.नं. 179/2014

13 भोसरी, पिंपरी चिंचवड गु.र.नं. 113/2014

14 सांगवी, पिंपरी चिंचवड गु.र.नं. 63/2014 

15 चिंचवड, पिंपरी चिंचवड गु.र.नं. 264/2013

16 चिंचवड, पिंपरी चिंचवड गु.र.नं. 248/2013

17 सिडको, छत्रपती संभाजीनगर गु.र.नं. 106/2013

18 चिंचवड, पिंपरी चिंचवड गु.र.नं. 80/2014

19 कोथरुड,पुणे शहर गु.र.नं. 296/2011

20 हडपर, पुणे शहर गु.र.नं. 492/2012

21 कोथरुड, पुणे शहर गु.र.नं. 297/2011

22 उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर गु.र.नं. 79/2013

23 फरासखान, पुणे शहर गु.र.नं. 27/2014

तसेच सदर आरोपीविरुध्द वरील गुन्हे व्यतिरिक्त आणखी 100 ते 125 गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. ताब्यातील आरोपीस पुढील तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलेले असुन पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन हे करीत आहेत.  

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!