संगमनेर : लहान मुलीवर ज्वलनशील पदार्थ हल्ला
आरोपी अद्याप पसार, शोधासाठी दहा पथके
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील तेरा वर्षीय शाळकरी मुलीवर ॲसिड सदृश्य ज्वलनशील पदार्थ चेहऱ्यावर टाकून तिला जखमी करण्यात आले होते. या धक्कादायक घटनेतील आरोपी अद्याप निष्पन्न झाले नसून ते पसार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत असून विविध ठिकाणी दहा पथके शोधासाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे
मिळालेल्या माहितीनुसार वडगाव पान येथील अल्पवयीन मुलीवरील ॲसिड सदृश्य ज्वलनशील पदार्थाच्या अटॅक प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी पीडित मुलीच्या आई ने दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा रजिस्टर क्रमांक126/2026 कलम BNS 124(1), 126(2) खाली नोंद करण्यात आला आहे.
आरोपीचा शोध घेण्यासाठी दहा पथके तयार कार्यरत आहेत. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण, पीडितेकडून प्राप्त माहिती, व अन्य सर्व बाजूंनी सखोल तपास करण्यात येत आहे.
अद्याप पर्यंत आरोपी उघड झालेले नाहीत. वरील प्रमाणे तयार केलेली पथके, सायबर टीम, फॉरेन्सिक टीम कडून आरोपी उघड करण्या साठी तपास सुरू आहे.
प्रवरानगर मेडिकल ट्रस्ट हॉस्पिटल लोणी येथील विशेष तज्ञ डॉक्टर्स उपचार करत असून, तिच्या उपचारांवर तज्ञांकडून बारकाईने देखरेख ठेवण्यात आली आहे. पीडित अल्पवयीन मुलीची तब्येत स्थिर असल्याचे समजले आहे.
