पारनेर व सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा धुमाकूळ !
गुटखा विक्री – जुगार, दारू अड्ड्यांवर एलसीबीची धडक कारवाई ; 17 गुन्हे दाखल
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
पारनेर आणि सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) ने धडक कारवाई करीत अवैध गुटखा विक्री, जुगार दारू अड्ड्यांवर छापे टाकले असून या कारवाईत एकूण 17 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे या दोन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असल्याचे उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार खालीलप्रमाणे अवैध धंद्यावर प्रभावी कारवाया करण्यात आलेल्या आहेत.

जुगार
अ.नं. गु.र.नं. व कलम आरोपीचे नांव पत्ता जप्त मुद्देमाल
1 पारनेर 65/2026 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) सचिन बबन आव्हाड वय 38 रा. हंगा, ता. पारनेर 1080/- रुपये
2 पारनेर 66/2026 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) जुबेर उस्मान खान वय 36, रा. शाहुनगर, पारनेर 1440/- रुपये
3 पारनेर 67/2026 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) रावसाहेब विठ्ठल कावरे वय 50, रा. कावरे मळा, पारनेर 1020/- रुपये
4 पारनेर 70/2026 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) पोपट चंदर साळवे वय – 53, रा. जवळा, ता. पारनेर 1350/- रुपये
5 सुपा 29/2026 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) मुनिर मुस्तफा शेख वय 33, रा. सुपा, ता. पारनेर 1700/- रुपये
6 सुपा 30/2026 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) युसुफ गुलाब शेख वय 53, रा. सुपा, ता. पारनेर 1200/- रुपये
7 सुपा 31/2026 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) संपत जनार्धन पंधरकर वय – 59 रा. सुपा, ता. पारनेर 2100/- रुपये

दारु
अ.नं. गु.र.नं. व कलम आरोपीचे नांव पत्ता जप्त मुद्देमाल
1 पारनेर 68/2026 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) महादेव झुंबर पागिरे वय 43 वर्षे, रा. नेवासा खुर्द, ता. नेवासा 960/- रुपये
2 पारनेर 69/2026 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) सोन्याबापु धारासिंग गव्हाणे रा. राळेगण थेरपाळ, ता. पारनेर 4000/- रुपये
3 पारनेर 71/2026 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) चाँद जमालुद्दीन शेख रा. जवळा, ता. पारनेर 5000/- रुपये
4 पारनेर 72/2026 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) सुनिल उर्फ संकेत विष्णु कोकाटे वय 25 वर्षे, रा. वरणवाडी, पोखरी, ता. पारनेर 2600/- रुपये
5 पारनेर 72/2026 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) संकेत संतोष साळवे वय – 24 वर्षे, रा. टाकळीढोकेश्वर, ता. पारनेर 3500/- रुपये
6 पारनेर 74/2026 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) विजय वासुदेव गुरव रा. सोबलेवाडी, ता. पारनेर 2060/- रुपये
7 सुपा ü 32/2026 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) मच्छिंद्र नाना बारगळ रा. सुपा, ता. पारनेर 11100/- रुपये
8 सुपा ü 33/2026 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) लक्ष्मण नाना बारगळ रा. सुपा, ता. पारनेर 720/- रुपये
9 सुपा 34/2026 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) स्वप्नील सोन्याबापु साबळे वय 32, रा. पारनेर 1200/- रुपये

गुटखा
अ.नं. गु.र.नं. व कलम आरोपीचे नांव पत्ता जप्त मुद्देमाल
1 पारनेर 64/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223, 274, 275 1) अक्षय भास्कर लाळगे वय 27 वर्षे,
रा. निघोज, ता. पारनेर
2) योगेश मनोहर दंडवते रा. मलठण,
ता. शिरुर, जि. पुणे (फरार)
3) नवनाथ आढाव रा. पुणे (फरार)
4) आप्पा कांचन रा. पुणे (फरार) 5,48,400/- रुपये किमतीचा गुटखा व स्विफ्ट डिझायर कार नंबर एम. एच. 14 डी. टी. 5886

वरीलप्रमाणे जुगार सदराखाली 7 आरोपीविरुध्द 7 गुन्हे दाखल करुन 9890/- रुपये किमतीचा मुद्देमाल, दारुबंदी सदराखाली 9 आरोपीविरुध्द 9 गुन्हे दाखल करुन 31,140/- रुपये किमतीचा मुद्देमाल व गुटखा कब्जात बाळगून विक्री करणाऱ्या 4 इसमाविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यांच्याकडून 5,48,400/- रुपये किमतीचा असा एकुण 5,89,430/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन 17 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
गुन्हे शाखेतील पोउपनि/समीर अभंग, पोलीस अंमलदार हृदय घोडके, दिपक घाटकर, लक्ष्मण खोकले, अतुल लोटके, सुयोग सुपेकर, बिरप्पा करमल, भिमराज खर्से, राहुल डोके, बाळासाहेब नागरगोजे, प्रकाश मांडगे, सागर ससाणे, योगेश कर्डीले, अमृत आढाव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
