वाळू तस्करी करणाऱ्यांना पकडले !

50 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त 

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात वाळू तस्करी, वाळू चोरी, अवैध वाळू वाहतूक, अवैध गौण खनिज उत्खननाने उच्छाद मांडला असून पोलिसांनी पोलिसांच्या सातत्याने कारवाया सुरू आहेत. जिल्हा गुन्हे शाखा (एलसीबी) ने मोठ्या प्रमाणावर कारवाई करीत वाळू वाहतूक तस्करी करणाऱ्यांना पकडले असून चार गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये 50 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथर्डी व शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध चोरुन वाळूची वाहतूक करणाऱ्या तस्करांची माहिती काढून छापे टाकले.

खालील प्रमाणे कारवाई केली आहे. 

अ.क्र. पो.स्टे. गुरनं जप्त मुद्देमाल आरोपीचे नाव

1 पाथर्डी गु.र.नं. 76/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2), 3(5) 40,50,000/-(5 ब्रास वाळु) 1) अनिल साहेबराव लबडे (वय – 52 वर्षे रा. तोंडोळी ता. पाथर्डी) 2) भाऊसाहेब आप्पासाहेब काकडे (रा.तोंडोळी ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर(डंम्पर मालक) (फरार)

3) शेवगाव गु.र.नं. 61/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2), सह गौण खणीज अधी.क.3/15 5,10,000/- (1 ब्रास वाळु)1) सुरज परसराम बुटे (वय- 20 वर्षे रा. ढोरजळगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर)

4) पाथर्डी गु.र.नं. 77/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे 5,10,000/-(1 ब्रास वाळु) 1) सचिन विठ्ठल बडे, (वय- 36 वर्षे रा. येळी ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) 

एकुण 4 गुन्हे दाखल 50,70,000/- रु कि.मुद्देमाल जप्त 4 आरोपीविरुध्द कारवाई करण्यात आले आहे. पोनि/श्री. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/समीर अभंग, राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार ह्रदय घोडके, दिपक घाटकर, संतोष खैरे, सुयोग सुपेकर, श्यामसुंदर जाधव, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाठ. बाळासाहेब खेडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!