आता…
संगमनेर तालुका पोलिस हद्दीत घरफोडी !
संगमनेर | प्रतिनिधी
संगमनेर शहरापाठोपाठ संगमनेर तालुका पोलिस हद्दीत देखील चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून घरफोड्या चोऱ्या चे सत्र चालूच आहे. संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी झाली असून चोरट्यांनी सोने चांदीचे दागिने लंपास केले आहेत.
संगमनेर तालुक्यातील कोकणगाव शिवारात फिर्यादीच्या राहत्या घरातून चोरट्यांनी 95 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. घरात प्रवेश करून कपाटामध्ये ठेवलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 95 हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे.
संगीता बाळासाहेब जोंधळे (राहणार कोकणगाव तालुका संगमनेर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे तपास करीत आहेत.



