संगमनेर बस स्थानक आणि शहरात चोर्‍या सुरूच !…

 सोन्याचे दागिने रोख रक्कम लंपास…

 संगमनेर प्रतिनिधी —

रतीब’ घातल्याप्रमाणे संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारही दिशांना दररोज चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. घरफोड्या चोऱ्या सातत्याने घडत असून शहरातील सर्वच भागांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. एकही महत्त्वाचे ठिकाण गजबजलेले चौक मंगल कार्यालय घर अशी कोणती जागा चोरट्यांनी चोरी करण्यासाठी सोडलेली नाही. सर्व ठिकाणी चोऱ्या सुरू आहेत. आता मंगल कार्यालय आणि बस स्थानकावर पुन्हा सोन्याच्या दागिन्यांची आणि रोख रक्कम चोरी करण्याची घटना घडली आहे.

संगमनेर मधील पंकज लॉन्स या ठिकाणी एका महिलेचे सुमारे 1 लाख 29 हजार रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या संदर्भात पुष्पावती किशोर दांगट (राहणार दांगट वाडी, आळेफाटा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. 

तर दुसरी घटना संगमनेर शहरातील बस स्थानकावर घडली असून फिर्यादी हिना याकूब पटेल (राहणार ब्राह्मणवाडा, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर) यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम बस स्थानकात चोरून नेल्याची फर्याद त्यांनी दिली आहे. संगमनेर शहर पोलिसांनी दोन्ही गुन्हे दाखल करण्याचे काम केले असून पुढील तपास सुरू आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!