संगमनेरच्या कत्तलखान्यांमध्ये एलसीबीची मोठी कारवाई !

 6000 किलो गोवंश मांस ; 9 जीवंत जनावरे ; लाखोंचा मुद्देमाल जप्त

महिनाभरात एलसीबीची चौथी कारवाई – संगमनेर शहर पोलीस झोपलेले….

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

संगमनेर शहरातील अवैध कत्तलखान्यांमधून गोहत्यांचे सत्र सुरूच आहे. एलसीबीने छापा टाकून गोवंश मांस, जिवंत जनावरे आणि इतर असा एकूण 33 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने गेल्या महिन्याभरात संगमनेरत केलेली ही चौथी मोठी कारवाई असून संगमनेर शहर पोलिसांकडून मात्र अवैध कत्तलखाने बंद करण्यासाठी कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. संगमनेरच्या कत्तलखान्यांमधून राजरोस गोवंश हत्या होण्यामागे पोलीस आणि कसायांची मिलीभगत असल्याचे बोलले जात आहे.

दिनांक 23/01/2026 रोजी रात्री संगमनेर शहर परिसरामध्ये कत्तलखान्याची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत जमजम कॉलनी, गल्ली नं.7 जुना जोर्वे रोड, संगमनेर येथील न्यु सेवा सॉ मिलच्या समोर वाड्यात मुद्दसर अब्दुल करीम कुरेश हा इतर दोन साथीदार हे त्यांचे हस्तकामार्फत महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशी जनावरांचे कत्तल करण्यास मनाई असतांना गोवंशी जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने आणून त्यांची कत्तल करत असल्याची माहिती मिळाली. 

सदर ठिकाणी काही इसम गोवंशीय जनावरांची कत्तल केलेले गोमांस वाहनामध्ये भरत असल्याचे दिसुन आले. तेव्हा पथकाने छापा टाकण्यासाठी जात असतांना गोवंश कत्तल व गोमांसाची वाहनांत भरत असलेल्या इसमांना पोलीसांची चाहूल लागताच ते अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. 

1) मुद्दसर अब्दुल करीम कुरेशी (फरार), 2) वाहीद अब्दुल करीम कुरेशी(फरार), 3) अक्रम अहमद कुरेशी(फरार), सर्व रा. भारतनगर, संगमनेर जि. अहिल्यानगर, 4) शेहबाज गुलाम हुसेन शेख रा. पुणे नाशिक रोड, नाईकवाडा पुरा, संगमनेर(फरार), 5) आदित्य राजेंद्र जाधव रा.526 जिल्हा परिषद शाळेच्या जवळ भोईदपाडा, गोखिवरे वसई पुर्व, पालघर अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सदर ठिकाणीवरुन 18,00,000/- रुपये किमतीचे 6,000 किलो गोमांस, 12,00,000/- रुपये किमतीचे दोन पिकअप वाहन, 3,30,000/-रु कि.चे 9 जिवंत गोवंशीय जनावरे, 1000/-रु कि.चे 2 सुरे, 1 कु-हाड असा एकुण 33,31,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

आरोपीविरुध्द संगमनेर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 82/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 271, 325, 3 (5) सह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारीत 2015 चे कलम 5, (ब), 5 (क), 9, 9 (अ) सह प्रा.नि.वा. अधि.कलम 3,11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे. 

 सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ आणि संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या कार्यालयातील पोलीस अंमलदार बापुसाहेब हांडे, राहुल सारबंदे, सुनिल ढाकणे या पथकाने केली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!