संगमनेर अमली पदार्थ – ड्रग्स प्रकरणी फरार आरोपींना पोलिसांनी पकडले !

अपर पोलीस अधीक्षक आणि डीवायएसपींच्या पथकाची संयुक्त कारवाई 

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

अमली पदार्थ आणि ड्रग्सची अवैध विक्री आणि तस्करी करणाऱ्या आरोपींवर संगमनेर मध्ये गुन्हा दाखल झाला होता. यातील काही आरोपी फरार झाले होते. त्यांचा शोध पोलीस घेत होते. यातील दोन आरोपींना श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि संगमनेर पोलीस उपअधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या संयुक्त पथकाने संगमनेर शहरात व नाशिक येथे छापा टाकून पकडले आहे.

मोहंमद साद खालीद शेख (वय २४ वर्षे रा. भारतनगर, संगमनेर), रेहान शेरखान पठाण (वय १९ वर्ष रा. वडाळा, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.

पोलिसांना मिळालेल्या खबरीनुसार संयुक्त पथकाला संबंधित आरोपी संगमनेर शहरातील भारत नगर परिसरात लपून बसला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सदर परिसरात छापा टाकला असता मोहम्मद शेख हा आढळून आला. त्याला पकडल्यानंतर दुसरा आरोपी रेहान पठाण नाशिक येथे असल्याची माहिती मिळाली असता त्याला सुद्धा नाशिक येथून अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पो. कॉ अशोक शशिकांत गाडे, राजेंद्र भाऊसाहेब बिरदवडे, सहदेव सुभाष चव्हाण सर्व नेम- अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपुर, पो.ना. बापूसाहेब सूर्यभान हांडे, राहुल कैलास सारवंदे, सुनिल श्रीधर ढाकणे सर्व नेम उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, संगमनेर या संयुक्त पथकाने केली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!