नशेचे इंजेक्शन्स – बाटल्या विकणाऱ्याला एलसीबीने पकडले !
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
नशेच्या औषधांच्या बाटल्या आणि इंजेक्शन्स विकणाऱ्या व्यक्तीवर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत सदर व्यक्तीकडून नशेचे इंजेक्शन औषधाच्या बाटल्या जप्त करण्यात आले आहे.

रोहित रघुनात बांगर (रा.बागडपट्टी अहिल्यानगर) हा परवानधारकास डॉक्टराचे चिठ्ठीशिवाय विकता न येणारे औषध व इंजेक्शन विक्री करण्याकरीता कुरिअरद्वारे मागविले असून तो विक्री करण्यासाठी सिध्देश्वर मंदिर बागडपट्टी अहिल्यानगर येथे थांबलेला असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली.

पथकाने त्यास ताब्यात घेऊन 1) रोहित रघुनाथ बांगर (वय- 25 वर्षे रा. सिध्देश्वर मंदिराजवळ, बागडपट्टी, अहिल्यानगर) झडती घेतली असता त्याचे एकुण 11,299/- रुपये किमतीच्या नशेकरीता वापरल्या जाणाऱ्या 37 औषधी बाटल्या जप्त करण्यात आल्या.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ गणेश शिवनाथ लबडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना स्टेशन गु. र. नं. 50/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123,125,278 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.
पोउपनि/ अनंत सालगुडे, गणेश लबडे, संतोष खैरे, सुयोग सुपेकर, दिपक घाटकर, रोहित येमुल, अमोल आजबे, उत्तरेश्वर मोराळे, महिला पोलीस अंमदार वंदना मोढवे या पथकाने ही कारवाई केली आहे.

