अवैध गॅस रिफिलींग, ऑनलाईन बिंगो जुगार, अवैध देशी दारु, गावठी दारु अड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई !
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
स्थानिक गुन्हे शाखा एलसीबीने विविध ठिकाणी धडक कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये अवैध गॅस रिफीलिंग, ऑनलाईन बिंगो जुगार, अवैध देशी दारू, गावठी छापे टाकण्यात आले आहेत. यावेळी मोठा मुद्द्यामाल हस्तगत करण्यात आला असून ही कारवाई अहिल्यानगर शहरासह नेवासा तालुक्यात करण्यात आली आहे.

पथकाने कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ऑनलाईन बिंगो जुगार, तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गॅस रिफिलींग व नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध देशी दारु व गावठी हातभट्टीची विक्री करणाऱ्यांची माहिती काढून छापे टाकले आहेत त्यामध्ये खालील कारवाई केली आहे.
अ.क्र. पो.स्टे. गुरनं जप्त मुद्देमाल आरोपीचे नाव
1 कोतवाली गु.र.नं. 52/2026 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे 2,63,300 /- 1) उमेश विठ्ठल राऊत (वय- 28 वर्षे रा. सारसनगर अहिल्यानगर)
2) सोनु संदिप आजबे (वय -19 वर्षे रा. सदर)
3) विशाल बापु गोसावी (वय- 25 वर्षे रा. केडगांव अहिल्यानगर)
4) आकाश भास्कर गोसावी (वय -27 वर्षे रा. पिंपळगाव उजैनी ता.जि. अहिल्यानगर)

2 तोफखाना गु.र.नं. 49/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 125,287,288 कप्रमाणे 44,500/- 1) किरण बबन दंडवते (वय- 41 वर्षे रा. परिचय हॉटेलमागे सावेडी ता.जि. अहिल्यानगर) 3 नेवासा गु.र.नं.54/2026 दारुबंदी कायदा कलम 65(ई) 11,000/- विजय अशोक चव्हाण (वय-38 वर्षे रा. देवगड ता.नेवासा जि. अहिल्यानगर) 4 नेवासा गु.र.नं.55/2026 दारुबंदी कायदा कलम 65(ई) 1400/- गणेश सोन्याबापु धेडगे (वय-25 वर्षे रा. देवगड ता.नेवासा जि. अहिल्यानगर) एकुण 04 गुन्हे दाखल करण्यात आले असून 3 लाख 32 हजार 240/- रुपयांचा मुद्देमाल असलगत करण्यात आला आहे तर 7 आरोपीविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार अतुल लोटके, सुनिल पवार, गणेश लबडे, गणेश धोत्रे, शाहिद शेख, दिपक घाटकर, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाठ, बाळासाहेब खेडकर, रोहित येमुल, उत्तरेश्वर मोराळे या पथकाने सदर कारवाई केली आहे.
