विठ्ठल रुख्मीणी मंदीरातील दागिने चोरणारे सराईत चोरटे पकडले !

सर्व आरोपी संगमनेर तालुक्यातील….

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : 10 लाख 52 हजाराचा मुद्देमाल हस्तगत

 सराईत आरोपींवर अनेक गुन्हे दाखल 

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

हिंगणी (ता. श्रीगोंदा) येथील विठ्ठल रुख्मीणी मंदीराच्या गाभाऱ्यातील चांदीचे दागिने लंपास करणारे सराईत चोरटे अहिल्यानगर एलसीबी च्या पथकाने पकडले आहेत.

पथक हे यापुर्वी मंदीर चोरीचे गुन्हे करणारे आरोपींचा अभिलेख तपासुन तसेच व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती काढत असतांना सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी 1) भास्कर खेमा पथवे (रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर) याने व त्याचे साथीदारांनी केला असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने आरोपीच्या राहत्या परिसरामध्ये जावुन सलग 4 दिवस तपास केला. मात्र आरोपी हा सतत बाहेरगावी फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली. व्यवसायीक कौशल्याचे आधारे आरोपीचा शोध घेत असतांना आरोपी हा चारचाकी वाहनातून संगमनेर कडून पारनेरच्या दिशेने येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. 

त्यानुसार टाकळीढोकेश्वर परिसरामध्ये सापळा रचून आरोपी 1) भास्कर खेमा पथवे, (वय 50 वर्षे, रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर,) 2) राजेंद्र ठकाजी उघडे, (वय 33 वर्षे, रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले. त्याचेकडे मंदीर गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी त्यांचा साथीदार 3) संजय भास्कर गावडे (रा. नांदुरीदुमाला, ता. संगमनेर (फरार) याचेसह गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. 

ताब्यातील आरोपींकडून 5,10,000/- रुपये किमतीचा चांदीचा मुखवटा, 30,000/- रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन, 8400/- रुपये रोख रक्कम, 5200/- रुपये किमतीचे चोरी करण्याकरीता वापरण्यात आलेली हत्यारे, 5,00,000/- रुपये किमतीची तवेरा गाडी क्रमांक एम.एच. 04 सी.एम. 6712 असा एकुण 10,52,600/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, संतोष खैरे, फुरकान शेख, दिपक घाटकर, भिमराज खर्से, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, रोहित येमुल, आकाश काळे, योगेश कर्डीले, अरुण मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 या सराईत आरोपींवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

अ.नं. पोलीस स्टेशन गु. र. नं. व कलम

1 बेलवंडी पोलीस ठाणे 06/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331 (4), 305 प्रमाणे

2 पारनेर पोलीस ठाणे 897/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331 (4), 305

3 राजुर पोलीस ठाणे 406/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305(ब)

4 बेलवंडी पोलीस ठाणे 434/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331 (4), 305

5 आश्वी पोलीस ठाणे 215/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305(अ), वगैरे

6 नेवासा पोलीस ठाणे 1029/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 62 प्रमाणे

आरोपी भास्कर खेमा पथवे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहिल्यानगर, पुणे व नाशिक जिल्ह्यात मंदीर चोरीचे एकुण – 17 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे.

अ.नं. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

1 संगमनेर तालुका 184/2005 भादवि कलम 457, 380

2 संगमनेर तालुका 246/2010 भादवि कलम 379

3 घारगांव 24/2012 भादवि कलम 379

4 घारगांव 48/2012 भादवि कलम 399, 402

5 संगमनेर तालुका 168/2013 भादवि कलम 459, 380, 511

6 नाशिक रोड, नाशिक 247/2015 भादवि कलम 379, 34

7 नाशिक रोड, नाशिक 250/2016 भादवि कलम 379, 34

8 पारनेर 209/2017 भादवि कलम 380

9 अकोले 21/2018 भादवि कलम 124

10 पारनेर 253/2018 भादवि कलम 457, 380

11 पारनेर 274/2018 भादवि कलम 457, 380

12 ओतुर, पुणे 18/2019 भादवि कलम 454, 380, 379

13 सोनई 553/2020 भादवि कलम 457, 380

14 राहाता 507/2020 भादवि कलम 457, 380 

15 जेजुरी, पुणे 09/2021 भादवि कलम 380

16 संगमनेर शहर 730/2022 भादवि कलम 457, 380

17 श्रीगोंदा 140/2024 भादवि कलम 457, 380 प्रमाणे

आरोपी राजेंद्र ठकाजी उघडे याचे विरुध्द विरुध्द अहिल्यानगर जिल्ह्यात खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहे. 

अ.नं. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

1 संगमनेर तालुका 168/2013 भादवि कलम 459, 380

2 श्रीगोंदा 140/2024 भादवि कलम 457, 380 प्रमाणे

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना बेलवंडी पोलीस ठाणे गु.र.नं. 06/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(4), 305 प्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी बेलवंडी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास बेलवंडी पोलीस ठाणे करीत आहेत. 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!