एलसीबी ची वाळू तस्करांवर मोठी कारवाई !

 ८२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

संपूर्ण नगर जिल्ह्यात अवैध धंद्यांनी हैदोस घातला आहे. त्याचबरोबर चोऱ्या घरफोडी मंगळसूत्र गंठण चोऱ्या याचे देखील प्रमाण वाढले आहे. वाळू तस्करीचे प्रमाण सातत्याने वाढत असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कारवाईचे आदेश दिले असले तरी दररोज मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातील सर्वच नद्यांमधून वाळू चोरी मोठ्या प्रमाणावर होत आहे. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) ने कर्जत तालुक्यातील मिरजगाव आणि जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाळू उपसा करणाऱ्या विरुद्ध धडक कारवाई करून 82 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/समीर अभंग, पोलीस अंमलदार ह्रदय घोडके, बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर यांच्या पत्कार्य ही कारवाई केली आहे 

संदिप अशोक जाधव (वय- 27 वर्षे रा.खडकत, ता. आष्टी, जि.बीड) नितीन केरबा कापरे (वय- 31 वर्षे रा. नागलवाडी ता.कर्जत, जि. अहिल्यानगर) अलम निजामुद्दीन शेख (वय- 30 वर्षे रा. बडाअरा बुजुर्ग, ता.तमकोहीराज, जि. देवरीया उत्तर प्रदेश हल्ली रा. नागलवाडी, ता. कर्जत) अजय खेडर (पुर्ण नांव माहिती नाही),(फरार) ऋषिकेश खेडकर (पुर्ण नांव माहित नाही) (फरार) (दोघे रा. सांगवी ता.आष्टी, जि.बीड) जेसीबीचे मालक संभाजी बाबुराव बांदल (रा.नागलवाडी ता. कर्जत(फरार) धनंजय बांदल (पुर्ण नांव माहित नाही, रा.नागलवाडी ता.कर्जत जि. अहिल्यानगर (फरार) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

वरील आरोपी मिरजगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागापूर गावच्या शिवारात अवैधरित्या वाळू उपसा करताना आढळून आले. त्यावेळी एलसीबीच्या पथकाने छापा टाकून त्यांना पकडले आहे. सदर ठिकाणी दोन जेसीबीच्या साह्याने तीन ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये गौण खनिज भरत असतांना आढळून आले. पथक सदर ठिकाणी छापा टाकण्यासाठी जात असतांना काही आरोपी पळून गेले.

आरोपींच्या ताब्यातून 50,00,000/- रुपये किमतीचे दोन जेसीबी, 24000,000/-रु कि.चे तीन वेगवेगळ्या कंनपीचे ट्रॅक्टर ट्रॉली, 30,000/-रु कि.ची 3 ब्रास वाळू असा एकुण 74,30,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीविरुध्द पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब राजु काळे नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मिरजगाव पोलीस ठाणे गु.र.नं. 18/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2), सह पर्यावरण कायदा कलम 3/15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मिरजगाव पोलीस स्टेशन करीत आहे. 

तसेच वरील पथक खर्डा पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध वाळू उत्खनन/उपसा बाबत माहिती काढत असताना, पहाटे पथकास गुप्त बातमीदारा मार्फत खर्डा शहर परिसरात खर्डा ते भुम रोडवर गौण खनिज वाळूने भरलेला ट्रॅक्टर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने खर्डा बस स्टॅन्ड समोर सापळा रचून योगेश अण्णा सुरवासे (वय- 28 वर्षे रा. खर्डा ता.जामखेड) यास पकडले.

सदर आरोपेकडून 8,00,000/- रुपये किमतीचा एक ट्रॅक्टर ट्रॉली, 10,000/-रु कि.ची 1 ब्रास वाळु असा एकुण 8,10,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीविरुध्द पोलीस नाईक श्यामसुंदर अंकुश जाधव नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन खर्डा पोलीस ठाणे गु.र.नं. 09/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2), सह पर्यावरण कायदा कलम 3/15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशन करीत आहे. 

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!