तुमच्या बेगडी हिंदुत्वावर जनता विश्वास ठेवणार नाही — आमदार अमोल खताळ 

 संगमनेर प्रतिनिधी दिनांक 21 —

तालुक्यातील जनतेनं परावभ करुन तुमचा खुळखुळा केला आहे. तुमच्याविषयी कोणतीही सहानुभूती आता राहिलेली नाही. तालुक्यातील विकासाची घडी आता चांगल्या पद्धतीने बसत असल्याचे तुम्हाला सहन होत नसल्यामुळेच मोर्चे काढण्याची वेळ आली आहे. परंतू तुमच्या बेगडी हिंदुत्वावर जनता विश्वास ठेवणार नाही. मला कोणी समज देण्याचे सल्ले देण्यापेक्षा भविष्यात राहुल गांधीच तुम्हाला आता समज देवून घरात बसवतील अशी टीका आमदार अमोल खताळ यांनी केली.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शांती मोर्चाला प्रतिउत्तर देताना आमदार खताळ यांच्या प्रसिद्धी कार्यालयातून पत्रक देण्यात आले आहे. त्यामध्ये त्यांनी वरील टीका केली आहे. प्रसिद्धी पत्रकात आमदार खताळ म्हणाले आहेत की, माजी आमदारांनी काढलेल्या मोर्चाबद्दल मला कोणतेही भाष्य करायचे नाही. त्यांनी खतपाणी घातल्यामुळेच घुलेवाडीतील घटनेला राजकीय पार्श्वभूमी मिळाली. कटकारस्थान करुन किर्तनामध्ये त्यांच्या स्विय सहायकानेच गोंधळ घातल्याचा आरोप करुन आज भगवे झेंडे घेवून तुम्ही सहानुभूमी मिळविण्यासाठी रस्त्यावर उतरला असला तरी सोयीनुसार हिंदुत्ववाद स्विकारण्याचा तुमचा प्रयत्न जनतेनं केव्हाच ओळखला आहे. यापूर्वी तालुक्यात हिंदुत्ववादी कार्यकर्ते, युवक-युवती यांच्यावर हल्ले करण्याचे प्रकार घडले त्यावेळी तुमची सद्भवना कुठे गेली होती ? सकल हिंदु समाजाचा मोर्चाला विरोध करणारे पत्रक अजुनही जनता विसरलेली नाही. त्यामुळेच अडचणीत आलात की हिंदुत्ववादी असल्याचे दाखवायचे हे संगमनेरी जनता कधीही मान्य करणार नाही.

तालुक्यात कोणतीही गुंडगिरी चालू नाही. विधानसभा निवडणूकीनंतर विकास कामांची घडी चांगल्या पद्धतीने बसत आहे. मात्र ज्यांची राजकीय घडी विस्कटलेली आहे ते मोठ्या प्रमाणात अस्वस्थ झालेले आहे. येथील बाजारपेठ व व्यापार आता मोकळा श्वास घेवून चांगल्या पद्धतीने सुरु आहे. पण यापूर्वी व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करणारे कोणाचे कार्यकर्ते होते. त्यांना पाठीशी कोणी घातले असे सवाल पत्रकात करण्यात आले आहे. डीएनए च्या बाबतीत माजी आमदारांनी केलेले आरोप हे निरर्थक आहेत. माझा डीएनए वारकरी सांप्रदायातला आहे. गेली २३ वर्षे माझी आई वारीला जाते या अर्थाने मी बोललो. परंतू माजी आमदार या विषयाचा गैर अर्थ काढून सहानूभुती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वी त्यांनी मला खबऱ्या म्हणून हिणवले नंतर हत्यार म्हणून हिणवले आता कुणाचेतरी खेळणं झाल्याचे ते म्हणतात परंतू जनतेनं तुमचा खुळखुळा केला आता तो वाजवत बसा. असे हे पत्रकात म्हटले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!