अकोले शिवसेनेच्या गण प्रमुखांच्या नेमणुका —
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मारुती मेंगाळ यांची मोर्चे बांधणी
अकोले प्रतिनिधी दिनांक 25 –
महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगर पंचायत या सारख्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां पुढील 3 ते 4 महिन्यात होतील. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी आपली आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अकोले तालुक्यात देखील सर्व जिल्हा परिषद गटांमध्ये गट प्रमुख तसेच गण प्रमुखांच्या नेमणुका उपजिल्हाप्रमुख तथा माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली केल्या आहेत.


काही दिवसापूर्वी डॉ. जालिंदर भोर यांच्या पुढाकारातून युवा नेते मारुती मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली अकोले तालुक्यातील अनेक नेत्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे येथे पक्ष प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर अकोले विधानसभा मतदारसंघात नव्याने पक्ष बांधणी सुरू केली असून पहिल्या टप्प्यात तालुका कार्यकारणीची निवड केली. त्या नंतर गट प्रमुख आणि आता काल झालेल्या शासकीय विश्रामगृहावर शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्या बैठकीत गण प्रमुख्यांच्या निवडी करण्यात आल्या.

पुढील पमाणे या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. अनिल अमृता आव्हाडा समशेरपूर गण, वाळीबा किसन भोईर खिरविरे गण, दादाभाऊ किसन रणपिसे देवठाण गण, प्रवीण चिमाजी मालुंजकर गणोरे गण, प्रवीण रामभाऊ भांगरे, धुमाळवाडी गण, विलास रामभाऊ उघडे
धामणगाव आवारी गण, जगन दगडू नलवडे, राजूर गण, संजय गोगा चौधरी वारंघुशी गण, प्रीतीश दत्तात्रय शेळके कोतुळ गण, सोमनाथ अंकुश चौधरी ब्राम्हणवाडा गण, रामदास मारुती वायाळ, शेलद गण, संतोष लक्ष्मण तळेकर पाडाळणे गण

या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक युवा सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष मुकुंद भोर, कार्याध्यक्ष जगन देशमुख, सचिव रोहिदास जाधव, उपतालुकाप्रमुख गणेश पापळ, शिवाजी पाटोळे, संजय गोडसे, विशाल गोंदके, संदीप आहेर, अकोले शहर प्रमुख सचिन शेटे, युवा सेना अकोले तालुका कार्याध्यक्ष महेश कोकतरे, गोविंद झोळेकर, प्रकाश पाचपुते, अनिल माने, पोपट मेंगाळ, सुधीर मधे, आनंद गिऱ्हे, बाळू मधे, तुकाराम मेंगाळ, नामदेव मधे, सचिन भालेराव, सुरेश लोखंडे, अजय भांगरे, सुरेश धुमाळ, संजय घोलप व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
