जोर्वे ग्रामपंचायतीचा गैरकारभार ; ग्रामस्थ आक्रमक
संगमनेर प्रतिनिधी 4 —
जोर्वे ग्रामपंचायती मधील मासिक सभा व ग्रामसभा यांतील अनियमितता व एप्रिल 2022 ते मार्च 2025 मधील 15 व्या वित्त आयोगातून विविध कामांमध्ये वस्तू खरेदीत झालेल्या गैरकारभार या विरोधात ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच याबाबतची निवेदनही देण्यात आले आहे.

गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बादशाह बोरकर (उपसरपंच ) दिगंबर इंगळे, किसन खैरे सदस्य, हौशिराम दिघे, संदीप काकड, संगीता थोरात, सुनीता दिघे, पूनम खैरे, मंगल काकड, आधी सदस्यांसह जगन्नाथ दिघे, मुकेश काकड, बाबासाहेब बोरकर, सोपान कांदळकर, संजय थोरात, शेख हमीद, वसंत बोरकर, संतोष जाधव, कैलास इंगळे, सुनील थोरात, भाऊसाहेब दिघे, राहुल बोरकर, सुनील दिघे, भाऊराव बोरकर, विठ्ठल काकड, दत्तात्रय काकड, रावसाहेब काकड, संपत थोरात, बलसाने राजेंद्र, अमित थोरात, अण्णासाहेब थोरात, प्रशांत गायकवाड, डॉ. प्रवीण काकड, रमेश दिघे, अक्षय दिघे, राजेंद्र थोरात, सत्यजित थोरात, विठ्ठल काकड, दत्तु नाना काकड, वसंत बोरकर, राहुल बोरकर आदि उपस्थित होते.

म्हटले आहे की, जोर्वे ग्रामपंचायतीची गैरकारभार व भ्रष्टाचार तक्रार आपले सरकार 14 एप्रिल 2025 रोजी केली असता ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून उत्तरादाखल 25/04/2025 सर्व माहिती जोर्वे ग्रामपंचायत मध्ये अर्जदार यांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे, असा खुलासा करण्यात केला. मात्र प्रत्यक्षात विचारणा केली असता कार्यालयीन कामकाज जास्त असल्याने दि. 31 मे 2025 नंतर माहीती उपलब्ध करून दिली जाईल असे कळविण्यात आले. आपणांस सातत्याने दिलेल्या अर्जाचा दोन महिने पेक्षा अधिकचा कालावधी होऊनही आपणाकडूनही कोणत्याही प्रकारची चौकशी केली जात नाही. ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्यांनाही विचारलेल्या कामांची माहिती लेखी व तोंडी मागणी करूनही दिली गेली नाही. दि. 30 मे 2025 रोजी झालेल्या ग्रामसभेत विचारलेल्या प्रश्नांना खरी उत्तरे न देता चुकीची माहिती देऊन ग्रामसभेची दिशाभूल केली.

सन 2022/23 तत्कालीन उपसरपंच गोकुळ दिघे व ग्रामविकास अधिकारी, यांनी 1). बाकडे खरेदी 4 लाख 13 हजार रु. 2). मेडीक्लोर औषध खरेदी 2 लाख 43 हजार रु. व औषधं फवारणी व 3) औषध खरेदी 1 लाख 96 हजार रु. अशी एकूण जवळपास 8 लाख 53 हजारांचा अपहार कागदोपत्री बोगस खरेदी बिलं दाखवून केला आहे.
याबाबत कोणतंही उत्तर ग्रामसभेत मिळालं नाही. तसेच सन 2024/25 या आर्थिक वर्षात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीवर प्रीती गोकुळ दिघे व ग्रामविकास अधिकारी यांनी लाखोंचा अपहार संगनमताने केला आहे. महीला सबलीकरणाच्या नावाखाली 4 लाख 12 हजार 560 रु. शिलाई मशीन खरेदी केल्याचे दिसत आहे. पण ग्रामपंचायत सदस्य यांना कोणत्याही प्रकारची खरेदी मासिक सभेत झाल्याची चर्चा नाही. लाभार्थी कोण आहेत, त्यांची निवड कशी व कधी केली याची कोणतीही माहिती सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी दिली नाही. वरील सर्व माहिती मेरी पंचायत या संकेतस्थळावर पाहील्यानंतर सदस्यांनी विचारना करुनही कोणतीही माहिती मिळाली नाही. अशाच प्रकारे जवळपास चार महीन्यांचा कालावधी उलटूनही 14 फेब्रुवारी 2025 रोजी 2 लाख 99 हजार रु. कचराकुंडी खरेदी केल्याचे आढळून आले आहे. त्यांचीही कागदोपत्री खरेदी दाखवुन अपहार झाला आहे. त्याबाबत ग्रामसभेत विचारणां केली असता कचराकुंडी येणार आहे अशी निरर्थक उत्तरे ग्रामसभेला दिली. नल-जलमित्र या नावाने १७ जाने २०२५ रोजी 49 हजार 500 रु रक्कम ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या पाणीपुरवठा कर्मचारी यांच्या ऐवजी तिसऱ्या व्यक्तिच्या खात्यावर वळती केलेली आहे.

सखोल निःपक्षपातीपणे चौकशी झाल्यास हा आकडा २५ ते ३० लाखाच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. सरपंच हे पालकमंत्री विखे पाटील यांचे समर्थक आहेत त्यामुळे वरील सर्वच बाबींची चौकशी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता तातडीने होणे अपेक्षित आहे. कोणतेही विकास कामं न करता माजी उपसरपंच गोकुळ दिघे व विद्यमान सरपंच प्रिती दिघे, गेल्या अनेक दिवसांपासून जोर्वेत कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी पवार यांनी जोर्वे ग्रामपंचारतीचे आणि जनतेच्या योजनेचे अक्षरशः लचके तोडले आहेत. वास्तविकपणे केलेल्या तक्रारीची चौकशी एक महीन्याच्या आत होणे अपेक्षित असतांना जोर्वे ग्रामपंचायतीत झालेल्या अपहार व अनियमितता संदर्भात आपणाकडून संबंधितांना राजकीय दाबापोटी पाठीशी घातले जाऊ नये. संबंधितांकडून जोर्वे ग्रामस्थांना धमकाविण्याचे हाणामारी, दमदाटी शिवीगाळ असे प्रकार सुरू असुन कागदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. आपणाकडून सात दिवसाच्या आत वरील गैरव्यहाराची चौकशी न झाल्यास विद्यमान जोर्वे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ पंचायत समिती संगमनेर येथे जन आंदोलन करुन उपोषणास बसणार आहे. असा इशाराही देण्यात आला आहे.
