पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या आतंकवाद्यांवर प्रतिहल्ला करा
कुरण ग्रामपंचायतीचा ठराव…
संगमनेर प्रतिनिधी 3
संगमनेर तालुक्यातील कुरण ग्रामपंचायती मध्ये आज रोजी (3/5/20025) ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत सामाजिक कार्यकर्ते उबेद शेख यांनी पहलगाम येथे पर्यटकनवर भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आतंकवाद्यांवर प्रतिहल्ला करून त्यांना समूळ नष्ट करावे असे सूचना मांडल्यानंतर त्याचा ठराव ग्रामपंचायत मध्ये घेण्यात आला. हल्ल्यात मृत्यूमुखी पडले, शहीद झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या सूचनेला तारमोहम्मद अब्बास यांनी अनुमोदन दिले व सर्व गावकऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली. हल्लेखोर हे पाकिस्तानातील असेल तर त्यांना शोधून त्यांच्यावर आपल्या सैनिकांनी त्यांच्यावर प्रति हल्ला करून त्यांना ठार करण्यात यावे. परत आपल्या भारतामध्ये आतंकवादी हल्ला करण्याचा त्यांच्या मनात विचारही येणार नाही, अशी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

ग्रामसभेमध्ये सरपंच इप्तेशाम रियाज तसेच उपसरपंच नदीम शेख, तारामोहम्मद अब्बास, लाला पटेल, म्हमापटेल, अख्तरभाई, जमीर सुलतान, दिलावर शेखलाल, नजीर अहमद, धोंडीराम मोगल, राजू करीम, ग्रामसेवक गंगाधर राऊत व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
