संगमनेर तालुक्यातील 6 रस्त्यांचे डांबरीकरण व मजबुतीकरण

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून 17 कोटी 59 लाख रुपयांचा निधी

प्रतिनिधी —

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील सहा रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी 17 कोटी 58 लाख 91 हजार रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती यशोधन कार्यालयातून देण्यात आली आहे.

आमदार थोरात यांनी तालुक्यातील विविध रस्त्यांकरता 14 जुलै 2023 रोजी दिलेल्या पत्रानुसार मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन अंतर्गत डिग्रस ते दरेवाडी हा 2.10 किलोमीटर लांबीचा रस्त्या करतात 2 कोटी 43 लाख 67 हजार रुपयांच्या निधी, तर पारेगाव बुद्रुक काकडवाडी पालखी रस्त्या करता दोन कोटी 73 लाख 22 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

याचबरोबर धांदरफळ ते करमाळा या रस्त्या करता 2 कोटी 73 लाख 22 हजार रुपये, राजापूर ते खतोडे वस्ती या रस्त्या करता 3 कोटी 50 लाख 48 हजार रुपये, जवळेकडलग ते वडगाव  लांडगा या रस्त्या करता 3 कोटी 15 लाख 89 हजार रुपये, शेंडेवाडी ते हिवरगाव पठार या पठार भागातील 3.30 km रस्त्या करता 3 कोटी 2 लाख 43 हजार रुपयांच्या निधी मंजूर झाला आहे. असा एकूण सहा रस्त्यांकरता 17 कोटी 58 लाख 91 हजार रुपयांचा एकूण निधी मंजूर झाला आहे.

नुकत्याच संत निवृत्तीनाथ महाराज पालखी पारेगाव बुद्रुक काकडवाडी तळेगाव या मार्गे गेली या रस्त्याच्या मजबुती व डांबरी करण्याकरता नागरिकांनी मागणी केली आमदार थोरात यांनी तातडीने याकरता निधी मंजूर घेतला असून हा पालखी मार्गे यातून होणार आहे. या निधीमधून या सर्व रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण होणार आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील रस्त्यांचे जाळे अधिक मंजूर होणार आहे.

हा निधी मंजूर केल्याबद्दल राजापूर ,जवळे कडलग, वडगाव लांडगा, शेंडेवाडी, हिवरगाव पठार, डीग्रस, दरेवाडी, पारेगाव बुद्रुक, काकडवाडी, धांदरफळ या गावातील नागरिकांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचे आभार व्यक्त केले आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!