समाज बांधवावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या मंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांच्या गुंडांवर कारवाईची मागणी
संगमनेर कुंभार समाजाच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन
प्रतिनिधी —
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांच्या गुंडांकडून कुंभार समाजाच्या गजानन बाबुलाल संत्रे यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याची आणि मारहाणीचीचौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी संगमनेर येथील कुंभार समाज बांधवांनी प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, आमचे समाज बांधव गजानन बाबुलाल संत्रे यांच्या घरावर व कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण कुंभार समाज घाबरलेला आहे. सत्तेतील अशा प्रतिष्ठित पदावर असलेल्या व्यक्तींनी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व त्यांच्या गुंडांनी जो भ्याड हल्ला केला आहे, त्यामुळे संत्रे कुटुंबीय तणावाखाली आहे. रात्रीच्या वेळी लोखंडी पाईप आणि सळ्या अशा शास्त्रांनी बेदम मारहाण करण्यात आली. हे गुंड मारहाण करून थांबले नाही तर त्यांनी घरही जमीन दोस्त केले आहे.

या गुंडांना राजाश्रय असल्याने गोरगरिबावर होणारा हल्ला पूर्णपणे निषेधार्ह आहे. म्हणून आम्ही संगमनेर समाजातील कुंभार समाजातील नागरिक शासनाच्या विनंती करत आहोत की, आमचे समाज बांधव संत्रे यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे. घराची झालेले नुकसान भरून काढावी. तसेच सर्व चौकशी करून शासनाने त्वरित आर्थिक मदत द्यावी. गुंडांना त्वरित अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणीत करण्यात आली असून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.

या निवेदनावर कैलास वाकचौरे, राजेंद्र जोर्वेकर, रमेश जोर्वेकर, सुरेश जोर्वेकर, हर्षल जोर्वेकर, दिलीप जोर्वेकर अनिल जोर्वेकर, रोहित जोर्वेकर, सचिन जोर्वेकर, मच्छिंद्र जोर्वेकर, राहुल जोर्वेकर, बाळासाहेब जोर्वेकर, अक्षय जोर्वेकर, पंकज जोर्वेकर, सागर जोर्वेकर स्वप्निल जोर्वेकर अतुल जगदाळे आदींच्या सह्या आहेत.
