अजित पवार गटातून सुनील तटकरे भाजपमध्ये जाऊ शकतात — आमदार रोहित पवार

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

जर भाजपात जायची वेळ आली तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून पहिली उडी सुनील तटकरे मारतील अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार रोहीत पवार यांनी केली आहे. तर त्यांच्या बालबुद्धी विचारांकडे आपण फारसे लक्ष देत नाही, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्यांनी मला राजकारण शिकवू नये असा टोला सुनील तटकरे यांनी लगावला आहे.

शेकापचे नेते जयंत पाटील यांनी देखील सुनील तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचे म्हटले आहे. तर त्यावर सुनील तटकरे यांनी पक्षाला लागलेली घरघर थांबायची असेल तर त्यांना अशी वक्तव्य करावे लागतात असे म्हटले आहे. साल 2019 च्या लोकसभा निवडणूकीत सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांचा पराभव केला होता. रायगड मतदार संघातून अनंत गीते यांचा तटकरे यांनी 31,438 मतांनी पराभव केला होता. शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या श्रीवर्धन आणि अलिबाग येतील मतांनी तटकरे यांचा विजय झाला होता. आता बदलत्या राजकीय परिस्थितीत शेकापचे जयंत पाटील अनंत गीते यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे आता निवडणूक निकालानंतरच काय चित्र पाहायला मिळते हे औत्सुक्याची बाब आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!