ज्या उद्देशाने SMBT ची स्थापना केली होती तो सफल झाल्याचे समाधान आहे — आमदार बाळासाहेब थोरात
हृदयविकारावर मात केलेल्या बालकांसमवेत साजरा केला वाढदिवस
प्रतिनिधी —
ह्रदयविकाराला हरवून आयुष्याची नवी सुरुवात केलेल्या ३५ बालकांसमवेत आज माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी ७१ वा वाढदिवस साजरा केला.
त्या वेळी आनंदी आणि भावुक झालेल्या आमदार थोरात यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

SMBT परिवाराने आयोजित केलेल्या अनोख्या कार्यक्रमात ह्रदयविकाराला हरवून आयुष्याची नवी सुरुवात केलेल्या ३५ बालकांसमवेत आज आमदार थोरात यांनी ७१ वा वाढदिवस साजरा केला.

SMBT च्या वेलनेस व्योयाग २०२४ मोहीमे अंतर्गत दर महिन्यात ३५ ते ४० लहान मुलांवर एसएमबीटी हार्ट इन्स्टीट्युटमध्ये मोफत हृदयविकार शस्रक्रिया केल्या जातात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून उपचारासाठी आलेल्या या बालकांसह त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरील जीवन जिंकल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
यावेळी एसएमबीटी च्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह, डॉक्टर स्टाफ सह मुख्य विश्वस्त डॉक्टर हर्षल तांबे हे उपस्थित होते.

