संगमनेर शिवसेनेच्या वतीने कारसेवक कृतज्ञता सोहळा
प्रतिनिधी —
शिवसेना संगमनेर शहर व तालुका यांचे वतीने कारसेवक कृतज्ञता सोहळा व्यापारी असोसिएशन हाॅल येथे मोठ्या दिमाखात पार पडला.

यावेळी कारसेवक गटाचे नेतृत्व करणारे वसंतराव गुंजाळ यांचे हस्ते माजी नगरसेवक अविनाश थोरात यांना प्रशस्तीपत्र व भगवे उपरणे देऊन गौरविण्यात आले.

शिवसेनेचे संगमनेर शहरप्रमुख आप्पा केसेकर, तालुका प्रमुख संजय फड, शिवसेना दिव्यांग सहाय सेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर लहामगे, शिवसेना विधानसभा समन्वयक कैलास वाकचौरे, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष संगमनेर, अकोले व राहाता उपजिल्हा सहसंघटक प्रमोद कुलट, शहर संघटक योगेश बिचकर, शिवसेना चित्रपट सेनेचे बाळासाहेब घोडके, समीर ओझा, भैय्या तांबोळी, युवा सेनेचे जितु केसेकर, बाला पिडीयार उपस्थित होते. शरीर स्वास्थ्यामुळे जे कारसेवक उपस्थित राहु शकले नाहीत. त्यांचा घरी जाऊन सन्मान केला जाईल. असे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले.

