एकविरा फाऊंडेशनच्या युवक युवतींनी केली गणपती निर्माल्याची साफसफाई !

प्रतिनिधी —

एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहरातील युवक – युवतींनी एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रवरानदी काठी निर्माल्य गोळा करुन साफसफाई व गणेश विसर्जनात काम केले.

गणेश उत्सवानिमित्त संगमनेर शहरातील अनेक मानाचे व इतर गणपती, घरगुती गणपती प्रवरा नदीकाठी विसर्जित करण्यासाठी आलेले असतात आमदार बाळासाहेब थोरात, डॉ.सुधीर तांबे व दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा युवक – युवती फाउंडेशनच्या वतीने नदीकाठी साफ सफाई अभियान राबविण्यात आले.

याअंतर्गत प्रवरा नदीकाठी असलेल्या गंगामाई घाटाच्या ठिकाणी, म्हाळूंगी नदीच्या काठी गणेश विसर्जन करण्यात येणाऱ्या विविध ठिकाणी या युवक – युवतींनी निर्माल्य गोळा केले. यामध्ये ४०० युवक – युवतींनी सहभाग घेतला. गटा गटाने युवतींनी वेग वेगळ्या ठिकाणी उभे राहून हे निर्माल्य गोळा केले. येणाऱ्या भाविकांना सर्व निर्माल्य एका ठिकाणी गोळा करावे असे आवाहन केले. तसेच गणेश विसर्जन सुद्धा नगर परिषदेने केलेल्या तळ्यामध्ये करावे यासाठी सुद्धा विनंती केली. यामुळे शहरातील नागरिकांची सोय झाली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!