शासनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करा — सोमनाथ वाघचौरे

राजुर येथे गणेशोत्सव मंडळाची बैठक

प्रतिनिधी —  

गणेश उत्सव साजरा करताना शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करणे बंधनकारक राहील, गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक दरम्यान सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य करू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये, काही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांचे निदर्शनास आणून द्यावे असे आवाहन संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे.

राजूर पोलीस ठाण्यात गणेश मंडळे व शांतता समीतीची बैठक संपन्न झाली. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कायदा वसुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून राजुर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी व पोलीस पाटील यांची मीटिंग पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या अध्यक्षते खाली पार पडली.

या वेळी राजुर चे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे वीज वितरण अधिकारी, इतर प्रशासकीय अधिकारी यांच्या सह मोठ्या संख्येने गणेश मंडळ उपस्थित होते.

वाघचौरे म्हणाले की, गणेशोत्सव काळात सामजिक हिताचे कार्यक्रम राबवावेत. मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे . तसेच राजूर पोलीस स्टेशन हद्दीतील ३८ गुन्हेगारांवर तडीपार नोटीस बजावण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.

 

यावेळी वीज वितरण अधिकारी सोनवणे, सार्वजनिक बांधकाम ललित पवार, प्राचार्य बी. वाय.देशमुख, व्यापारी संघाचे अध्यक्ष राम पन्हाळे, शांताराम काळे, शिवराम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

शशिकांत ओहरा, अकील तांबोळी, विजय फटांगरे, अशोक गाडे आदींसह परिसरातील सरपंच, पोलिस पाटील व गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते. सूत्रसंचालन भास्कर येलमामे तर प्रस्ताविक व आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी व्यक्त केले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!