संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड यांना ‘लाईफसेव्हर लिगसी’ पुरस्कार !

 प्रतिनिधी —

अर्पण ब्लड सेंटर व अर्पन थॅलेसेमिया  सोसायटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक रक्तदाता दिन आणि थॅलेसमिया दिना निमित्त अर्पण रक्तपेढी नाशिक आयोजित अर्पण मंथन २०२३ रक्तदान शिबीर संयोजक सत्कार आणि जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना मा. कुलगुरु डॉ. संजीव सोनवणे, य.च.म.मु.विद्यापीठ नाशिक यांचे हस्ते  ‘लाईफसेव्हर लिगसी अवार्ड’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. या प्रसंगी नितीन ठाकरे, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सहसचिव घनश्याम वासवाणी, आशा वेणूगोपाल, डॉ. एन.के. तातेड, डॉ. अतुल जैन, डॉ. वर्षा उगांवकर, कार्यकारी संचालक आदी उपस्थित होते.

शिक्षण प्रसारक संस्थेचे, कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी गेल्या १७ वर्षापासून  एन.सी.सी. विभागाचा कार्यभार सांभाळून या विभागाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी व समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना मनात ठेवून अपर्ण ब्लड बँकेसाठी अनेक रक्तदान शिबीरे घेऊन या पेढीसाठी रक्तदान शिबीरांच्या आयोजनाचे कार्य केलेले आहे.

यासाठी त्यांना फेब्रुवारी २०२० मध्ये रक्त प्रेरणा पुरस्कारही मिळालेला आहे. सद्यस्थितीत प्राचार्य या पदाची धूरा सांभाळत असताना त्यांनी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना यांचे सहकार्याने रक्तदानाचे, जीवनदानाचे कार्य सुरु ठेवलेले आहे. यासाठी लायन्स कल्ब सफायर यांचे देखील या रक्तपेढीसाठी मोलाचे कार्य आहे. त्यांनी केलेल्या या शैक्षणिक व सामाजिक बांधलकीच्या कार्याचा परिपाक म्हणून त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्राचार्य गायकवाड यांचे शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, सचिव डॉ. अनिल राठी, खनिदार राजकुमार गांधी, जनरल सेक्रेटरी सीए नारायण कलंत्री, व्यवस्थापनातील सर्व सदस्य, उपप्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!