संगमनेर उपविभागात पोलिसांनी राबविले ऑल आऊट ऑपरेशन !
उपअधीक्षक वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी छापे आणि कारवाई
प्रतिनिधी —
आगामी कालावधीमध्ये येणारे सण उत्सव शांततेमध्ये पार पडावे त्याप्रमाणे गुन्हेगारांवर एकत्रितरीत्या एकाच वेळी कारवाई करण्याच्या उद्देशाने संगमनेर उपविभागामध्ये मंगळवार दिनांक २० जून २०२३ रोजी रात्री आठ ते बुधवार दिनांक २१ जून २०२३ च्या पहाटे दोन वाजेपर्यंत ‘कोंबिंग ऑल आऊट ऑपरेशन’ राबवण्यात आले.

सदरच्या ALL OUT ऑपरेशन दरम्यान समन्स बजावणी, वारंट बजावणी, अटकवारंट मधील आरोपींना अटक करणे, पाहिजे फरार आरोपी अटक करणे, त्यांना चेक करणे, तडीपार गुन्हेगार चेक करणे, अवैध धंद्यांवर कारवाया करणे, त्याचप्रमाणे रात्रगस्त दरम्यान संशयितरित्या फिरणाऱ्यांवर कारवाई करणे, मोटार वाहन कायदा अंतर्गत विविध कारवाया करणे, रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणे, विविध मालमत्तेविषयी गुन्हे उघड करणे आदी बाबींसाठी सदरचे ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यात आले.

सदरच्या ऑपरेशन दरम्यान खालील प्रमाणे विविध कारवाया करण्यात आल्या….
• महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हे – ०७ गुन्हे दाखल केले आहे
• अटक वॉरंट बजावणी – २५
• बेलेबल वॉरंट बजावणी -१८
• समन्स बजावणी – १२२
• तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हे – ०७
• जुगार कायदा अंतर्गत रेड – ०५
• गोवंश हत्या बंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल – ०२
• नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदे अंतर्गत केलेल्या केसेस – ७६ कारवाया
• महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२/१२४ खालील गुन्हे – ०२
• drunk अँड ड्राईव्ह केसेस – ०६
• हिस्ट्री शिटर चेक – ३१

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर उपविभागातील सर्व पोलीस स्टेशन यांचे प्रभारी अधिकारी व पोलीस स्टाफ यांनी केलेली आहे.

यापुढे देखील वेळोवेळी कोंबिंग ऑपरेशन, ऑल आऊट ऑपरेशन राबवून उपविभागातील रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणे त्याचप्रमाणे त्यांच्यावरती सक्त प्रतिबंधक कारवाया पोलीस विभागाकडून सातत्याने करण्यात येणार आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

