नगर जिल्हा मुस्लिम ओबीसींचा रविवारी मेळावा
प्रतिनिधी —
अहमदनगर जिल्हा ओबीसी समाजाचा मेळावा उद्या रविवार दि. १८ जून २०२३ रोजी सायंकाळी ५ वा. श्रीरामपुर येथील ‘फातेमा हाऊसिंग सोसायटीत’ आयोजित केला असल्याची माहिती अन्वर हाजी शब्बीर तांबोळी यांनी दिली आहे .

तांबोळी यांनी दिलेल्या माहिती नुसार मुस्लिम ओबीसी समाजाचा अहमदनगर जिल्हा मेळावा ऑल इंडिया ओबीसी संघटनेचे अध्यक्ष हाजी शब्बीरभाई अहेमद अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली व नाशिक जिल्हा अध्यक्ष तनवीर तांबोळी, संगमनेर येथील शफीभाई तांबोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऊलुम रहेमते आलम मस्जिद, मदरसा, फातेमा हाऊसिंग सोसायटी, श्रीरामपुर येथे होणार आहे.

या मेळाव्यात जिल्हा कार्यकारणी जाहिर करण्यात येणार आहे. तसेच मुस्लिम ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त मुस्लिम ओबीसी समाजातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे अवाहनही अन्वर तांबोळी यांनी केले आहे.

