संगमनेर बस स्थानकात चोऱ्यांचे सत्र सुरूच !

एका महिलेच्या साडेदहा तोळे सोन्यासह लाखो रुपयांचे दागिने लंपास…

 

दरम्यान या दागिन्यांच्या चोरीसह संगमनेर बस स्थानकात गेल्या आठवड्यापासून दररोज सोन्याच्या दागिन्यांची चोरी होत आहे. अज्ञात चरोटे या ठिकाणी येऊन महिलांचे दागिने लंपास करत आहेत. पाकीट मारी करीत आहेत. बस स्थानकात पोलीस चौकी असूनही या पोलीस चौकीचा कोणताही उपयोग होताना दिसत नाही. पोलीस याबाबत निष्क्रिय आहेत.

 

प्रतिनिधी —

संगमनेर बस स्थानकावरील वारंवार होणाऱ्या चोऱ्यांचे सत्र सुरूच असून अज्ञात चोरट्यांनी गेल्या आठवड्यात चार पाच वेळा मोठ्या प्रमाणावर दागिन्यांची चोरी केली आहे. असे असताना बुधवारी संगमनेर बस स्थानकातून एका महिलेच्या सुमारे साडेदहा तोळे सोन्यावर चोरट्यांनी डल्ला मारला असल्याची घटना घडली आहे.


बसस्थानकावरील सुरक्षेबाबत गंभीर नसलेल्या संगमनेर पोलिसांच्या निष्क्रियतेचा फटका सामान्य प्रवाशांना बसत आहे.

बसस्थानकाहून राहुरीकडे निघालेल्या निवृत्त मुख्याधिपिकेच्या पर्स मधून अज्ञात चोरट्यांनी  तब्बल साडेदहा तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांसह ३ लाख १५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल लांबविला आहे.

दिनांक ८ मे रोजी सोमवारी घडलेल्या या घटनेची बुधवारी दिनांक १० मे रोजी रात्री उशिराने नोंद करण्यात आली. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सदरचा प्रकार गेल्या सोमवारी दुपारी बसस्थानकातून राहुरी मार्गे निघालेल्या ‘नाशिक-सोलापूर’ या बसमध्ये घडला. घुलेवाडी परिसरात राहणार्‍या निवृत्त मुख्याध्यापिका रजनी सूर्यभान सहाणे (वय६३ वर्षे ) या सोमवारी भाचीच्या लग्नाला सोनई (ता.नेवासा) येथे जाण्यासाठी संगमनेर बसस्थानकात आल्या. त्यांची मुलगी संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा येथे रहात असल्याने ती तेथून संगमनेरला आल्यानंतर ‘त्या’ दोघीही बसने राहुरीकडे जाणार होत्या.


मुलगी अर्चना ज्ञानेश्वर कर्पे या बसस्थानकात आल्यानंतर दोघीही ‘नाशिक-सोलापूर’ या बसजवळ आल्या. बसमधून जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी असल्याने दाटी वाटीने  दोघीही बसमध्ये चढल्या. सदरची बस नगर रस्त्यावरील ज्ञानमाता विद्यालयाजवळ आली असता बसच्या कंडक्टरने तिकिटाबाबत विचारणा केली असता सहाणे यांनी पैसे देण्यासाठी पर्स उघडली असता त्यात ठेवलेला सोन्याच्या दागिन्यांचा डबा गायब असल्याचे त्यांना दिसले.


सहाणे यांनी त्यांच्या जवळील सर्व बॅग, पिशव्या तपासल्यानंतरही दागिन्यांचा डबा सापडला नाही. त्यावेळी बसच्या वाहकाने पोलीस ठाण्यात तक्रार देण्याबाबत त्यांना सांगितले. सोनईहून संगमनेरला परतल्यानंतर रात्री उशिराने त्यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात जावून याबाबत तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सातपुते हे करत आहेत.

दरम्यान या दागिन्यांच्या चोरीसह संगमनेर बस स्थानकात गेल्या आठवड्यापासून दररोज सोन्याच्या दागिन्यांची चोरी होत आहे. अज्ञात चरोटे या ठिकाणी येऊन महिलांचे दागिने लंपास करत आहेत. पाकीट मारी करीत आहेत. बस स्थानकात पोलीस चौकी असूनही या पोलीस चौकीचा कोणताही उपयोग होताना दिसत नाही. पोलीस याबाबत निष्क्रिय आहेत

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!