संगमनेर बस स्थानकात दागिन्यांची चोरी !

प्रतिनिधी —

सातत्याने मोटारसायकल चोरी सुरू असतानाच संगमनेरातील चोऱ्या थांबलेल्या नाहीत. संगमनेर शहरातील बस स्थानकात बसमध्ये चढत असताना सोन्याची माळ आणि दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे.

शुक्रवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास संगमनेर बस स्थानकावर संगमनेर ते अकोले कडे जाणाऱ्या बस मध्ये फिर्यादी यांची पत्नी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने गळ्यातील सोन्याची माळ आणि मंगळसूत्र चोरून नेले आहे.

सोन्याची माळ आणि मंगळसूत्र यांचे वजन एकूण तीन तोळे होते. विश्वनाथ हरिदास लोंढे (राहणार इंदोरी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार धनवट हे या प्रकरणी तपास करीत आहेत.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!