गावठी कट्टा बाळगणारा आरोपी जेरबंद
प्रतिनिधी —
गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे बाळगणारा एक सराईत गुन्हेगार श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी गावातील एका हॉटेल जवळ येणार असल्याची गुप्त माहिती अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर त्या ठिकाणी सापळा असून या अवैध कट्टा वापरणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

प्रवीण उर्फ पव्या सुरेश साळुंके (वय 23 राहणार, नायगाव, तालुका वैजापूर, जिल्हा औरंगाबाद, हल्ली राहणार निमगाव खैरी, तालुका श्रीरामपूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार पथकाला सदर आरोपी हा श्रीरामपूर तालुक्यातील श्रीरामपूर – पुणतांबा रोडवरील निमगाव खैरी गावातील हॉटेल गीतगंगा येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती.

पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला असता थोड्याच वेळात संबंधित आरोपी त्या परिसरात संशयात संशयितरित्या करताना दिसला. पथकाने त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे मिळून आली आहेत.

सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली असून या आरोपीवर अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी प्रवीण साळुंके याने हा गावठी कट्टा व जिवंत काडतुसे प्रशांत उर्फ पांडू साईनाथ लेकुरवाळे (राहणार निमगाव खैरी, तालुका श्रीरामपूर) याच्याकडून विकत घेतले असल्याचे सांगितले.

त्यानुसार पथकाने मिळालेल्या पत्त्यावर जाऊन शोध घेतला असता तो इसम मिळून आला नाही त्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागला नाही. आरोपी प्रवीण साळुंके यांच्याकडून गावठी कट्टा व जिवंत काडतुसे असा एकूण ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन करत आहे.

सदर आरोपी प्रवीण साळुंखे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अहमदनगर व पुणे जिल्ह्यात दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी, घरफोडी आर्म ॲक्ट अशा गंभीर स्वरूपाचे एकूण दहा गुन्हे दाखल आहेत. तसेच गावठी कट्टा विक्री करणारा प्रशांत उर्फ पांडू साईनाथ लेकुरवाळे हा देखील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध आर्म ॲक्ट, गुन्ह्याचा कट करणे, माहिती लपवणे असे गंभीर स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल आहेत.

गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीला सापळा रचून अटक करणाऱ्या पथकांमध्ये पोलीस हवलदार विजयकुमार वेठेकर, पोलीस नाईक शंकर चौधरी, सचिन आडबल, संदीप दरंदले, राहुल सोळुंके, संभाजी कोतकर यांनी कारवाईत सहभाग घेतला.

