निझर्णेश्वर डोगंरावर भगवा ध्वज फडकावत राजमाता जिजाऊ जयंती साजरी…
प्रतिनिधी —
आज १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी केली जात असताना संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल श्री स्वामी समर्थ उद्योग समुहाच्या तरुणानी पहाटे निझर्णेश्वर महादेव डोगंरावर भगवा ध्वज फडकावून जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त अनोखी आदरांजली वाहिली आहे.

गुरुवारी पहाटे आश्वी खुर्द येथिल तरुण निझर्णेश्वर महादेवाच्या डोगंरावर गेले होते. यावेळी त्यानी त्याठिकाणी असलेला जुना व खराब झालेला भगवा ध्वज खाली उतरवला व आपल्या बरोबर आणलेला नवा कोरा भगवा ध्वज फडकवला. यावेळी त्यानी राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करत जिजाऊ वंदना गायीली. तसेच यावेळी या तरुणानी त्याठिकाणी असलेल्या महादेवाच्या पिंडीवर जल अभिषेक देखील केला आहे.

दरम्यान जिजाऊ जयंतीनिमित्त उगवत्या सुर्याला भगव्याची मानवंदना देण्याचा अनोखा उपक्रम स्वामी समर्थ उद्योग समुहाचे संस्थापक संजय गायकवाड यांच्या पुढाकारातून साकारण्यात आला असून या उपक्रमात पपलेश लाहोटी, सचिन पोपळघट, कृष्णा हारदे व ऋषीकेष डमाळे आदि तरुण सहभागी झाले होते.

