संगमनेर साखर कारखाना दूध संघ आणि नगर परिषदेच्यावतीने होणारे प्रवरा नदीचे प्रदूषण थांबवा….!!
प्रवरा नदी बचाव कृती समितीचा आंदोलनाचा इशारा…
प्रांत अधिकारी आणि पोलिस यांना निवेदन दिले….
प्रतिनिधी —
संगमनेर कारखाना दूध संघ आणि नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येत असलेल्या प्रदूषित पाण्यावर तातडीने बंदी घालावी आणि प्रवरा नदी बचाव कृती समितीचे फ्लेक्सबोर्ड फाडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी आशी मागणी नदीपात्रा लगत असलेल्या गावातील ग्रामस्थांनी प्रांताधिकारी यांच्याकडे केली. प्रदूषित पाणी न थांबल्यास शुद्ध पाण्याच्या मागणीसाठी महीलांचा हंडा मोर्चा काढण्याचा इशारा कृती समितीच्या वतीने देण्यात आला.
प्रवरा नदी बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यानी नदीपात्रात सोडण्यात असलेल्या प्रदूषित पाण्याच्या विरोधात तक्रार करणारे निवेदन प्रातांधिकारी यांना सादर केले. या निवेदनासोबत नऊ ग्रामपंचायतींनी या प्रदूषित पाण्याच्या विरोधात केलेले ठराव आणि काही गावातील ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन जोडण्यात आले आहे. यापुर्वी प्रवरा नदी बचाव कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही संबंधित सहकारी संस्था आणि संगमनेर नगरपरिषदेच्या विरोधात प्रदूषित पाण्याचे नमुने सादर करून तक्रारी दाखल केल्या आहेत.
दरम्यान प्रवरा नदीपात्रातील हे पाणी प्रदूषण थांबवावे म्हणून सर्व गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येवून प्रवरा नदी बचाव कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीच्या वतीने काही गावात फ्लेक्सबोर्ड लावण्यात आले. परंतू जोर्वे कोल्हेवाडी कनकापूर कनोली, मनोली या गावात लावलेले फ्लेक्सबोर्ड फाडले गेल्याने गावात वादाचे प्रसंग निर्माण झाले.कृती समितीच्या कार्यकर्त्यानी याविरोधात तालुका पोलीसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.मात्र ही तक्रारीही दाखल करून घेण्यास पोलीसांनी नकार दिला मात्र कार्यकर्त्यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली. सर्व घटनेची चौकशी करुन गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन पोलिस प्रशासनाच्यावतीने देण्यात आले.
दरम्यान कृती समितीच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांना निवेदन देवून प्रदूषित पाण्याचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले. कारखाना, दूधसंघ आणि नगरपरिषदेच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून रसायनयुक्त आणि शहारातील सर्व हॉटेल दवाखान्यांचे पाणी नदीपात्रात सर्रासपणे सोडले जात असल्याने नदीपात्रा लगतच्या गावांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही गावांच्या पाणी पुरवठा योजनांच्या विहीरी नदीपात्रातच असल्याने या प्रदूषित पाण्याचा पाझर थेट पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्यात येत असल्याने नागरीकांचे आणि जमीनींचे आरोग्य धोक्यात आले आहे. जनावारांनाही हेच पाणी पिण्यासाठी देण्यात येत असल्याने पशुधनही संकटात सापडले असून शेतकऱ्यांचे दुहेरी अर्थिक नूकसान होत असल्याची बाब कृती समितीच्या वतीने प्रांताधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी कृती समितीचे राजेंद्र दिघे, नानासाहेब खुळे, नानासाहेब दिघे, महेश खुळे, राहुल दिघे, इंद्रभान दिघे, अनिल काळे, नितीन अरगडे, किरण गुंजाळ, साईश कोल्हे, ज्ञानदेव शिंदे, रविंद्र गाडे, सचिन शिंदे, गणपत शिंदे, आबासाहेब शिंदे, गोकूळ दिघे, संपत राक्षे, दादा गुंजाळ, पोपट कोल्हे, नानासाहेब थोरात, बाबासाहेब थोरात आदी उपस्थित होते.
दरम्यान या प्रदूषित पाण्याबाबत योग्य दखल न घेतल्यास ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा इशारा प्रशासनास दिला असून कृती समितीच्या वतीने आंदोलनाचा पहीला टप्पा म्हणून प्रदूषित पाण्याविरोधात सर्व गावांमधील महीलांचा शुद्ध पाण्यासाठी हंडामोर्चाचे काढणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
