चांगल्या समाज निर्मितीत पत्रकारांचे मोठे योगदान– महसूलमंत्री थोरात
पत्रकारांनी चुकीच्या गोष्टींना महत्त्व दिले नाही — बाजीराव खेमनर
संगमनेरच्या सुसंस्कृत वैभवशाली परंपरेत पत्रकारांचे ही मोठे योगदान – शरयू देशमुख
प्रतिनिधी
पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पत्रकारितेला महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, यांच्यापासून मोठी परंपरा आहे. चांगल्या समाज निर्मितीमध्ये पत्रकारांची मोलाची भूमिका राहिली असल्याचे गौरवोद्गार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.
अमृत उद्योग समूहाच्या वतीने यशोधन संपर्क कार्यालयात पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाजीराव खेमनर, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शरयूताई देशमुख प्रा. बाबा खरात, नामदेव कहांडळ यांच्यासह संगमनेर मधील पत्रकार उपस्थित होते.
ऑनलाइन पद्धतीने शुभेच्छा देताना मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, पत्रकारितेला मोठा समृद्ध इतिहास आहे .पत्रकार हा समाजाचा आरसा असून कायम चांगल्या व रचनात्मक कामाच्या पाठीशी उभा राहिला आहे. कोरोना संकटात सर्व पत्रकारांनी कोरोणा योद्धा म्हणून केलेले काम अत्यंत मोलाचे आहे. समाजातील चुकीच्या गोष्टी जगासमोर मांडणे आणि चांगल्या कामाला प्रोत्साहन देणे हे काम पत्रकारितेने कायम केले आहे .चांगला समाज निर्मिती करण्यासाठी पत्रकारांचे मोठे योगदान असल्याचे मत थोरात यांनी व्यक्त केले.
तर बाजीराव खेमनर म्हणाले की, संगमनेर तालुका हा सुसंस्कृत व वैभवशाली विचारांचा तालुका ठरत आहे. या सर्व परंपरेमध्ये पत्रकारांचीही मोठे स्थान आहे. चुकीच्या गोष्टींना संगमनेर मधील पत्रकारांनी कधीही थारा दिलेला नसल्याचे ते म्हणाले
शरयू देशमुख म्हणाल्या की, संगमनेरची वैभवशाली वाटचाल सुरु आहे .यामध्ये सर्वांचे मोठे योगदान राहिले आहे. पत्रकार नेहमी धावपळ करत असतो .स्वतःच्या जीवनाकडे तो जास्त लक्ष देत नाही. या पुढील काळात प्रत्येकाने स्वतः च्या आरोग्याची काळजी घ्यावी असे त्या म्हणाल्या तर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ म्हणाले की, कष्टकरी व अन्याय झालेल्या व्यक्तींचा आवाज म्हणून पत्रकार काम करत आहेत. मात्र चांगल्या कामाच्या नेहमी पाठीशी राहिले आहेत. संगमनेरचा विकास व समृद्ध विचारप्रणाली ही इतरांसाठी दिशादर्शक असून आज सौ शहरी एक संगमनेरी हे राज्यात सिद्ध होत आहे. सर्व क्षेत्रात संगमनेरची आघाडी ही इतरांना मार्गदर्शक असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी राजेंद्र सिंग चौहाण किसन भाऊ हासे, विकास वाव्हळ, गोरक्ष नेहे, नीलिमा घाडगे, आनंद गायकवाड, राजेश जेधे, राजेश असोपा, गौतम गायकवाड, बाबासाहेब कडू, काशिनाथ गोसावी, आदेश वाकळे, सोमनाथ काळे, शिवाजी क्षीरसागर, सुखदेव गाडेकर, अमोल मतकर, शाविद शेख, शिवपाल सिंह ठाकुर, धीरज ठाकूर, साई दिघे आदी पत्रकार उपस्थित होते.
