लाभार्थी व अन्तोदय रेशन कार्ड प्रमुखाचे आधार कार्ड ऑनलाइनला जोडण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२२
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अन्तोदय कुटुंब लाभार्थी योजनेची शिधापत्रिका धारण करणाऱ्या शिधापत्रिका धारक यांच्या पैकी कुटुंब प्रमुख घोषित झालेल्या सदस्यांचे आधार कार्ड ऑनलाईन प्रणालीमध्ये जोडण्यात आलेले नाही, अशा लाभार्थ्यांना आधार कार्ड ऑनलाइन जोडण्यासाठीची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२२ असल्याचे तहसील कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

संगमनेर तालुक्यातील प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अन्तोदय कुटुंब लाभार्थी योजनेची शिधापत्रिका धारण करणाऱ्या शिधापत्रिका धारक यांच्या पैकी कुटुंब प्रमुख घोषित झालेल्या सदस्यांचे आधार कार्ड ऑनलाईन प्रणालीमध्ये जोडण्यात आलेले नाही, अशा कुटुंबाच्या याद्या गावातील स्वस्त धान्य दुकानात तसेच तलाठी व ग्रामसेवक यांचे कार्यालयात प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. तसेच गावातील WHATSAPP ग्रुपवर सर्वांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

तरी कुटुंब प्रमुख घोषित झालेल्या आणि ज्या सदस्यांचे आधार कार्ड ऑनलाईन प्रणालीमध्ये सामाविष्ट झालेले नाही अशा कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड आपले नाव असलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराकडे दिनांक ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत जमा करावेत.

वरील मुदतीत आधार कार्ड जमा न केल्यास ज्या कुटुंब प्रमुख सदस्यांचे व शिधापत्रिकेतील इतर सदस्यांचे आधार कार्ड ऑनलाईन केलेले नाही अशा शिधापत्रिका / सदस्य ऑनलाईन प्रणालीतून वगळण्यात येतील याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. असे आवाहन संगमनेरचे तहसिलदार अमोल निकम यांनी केले आहे.

