संगमनेरात शिवसेना महायुतीकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा निषेध

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते बसस्थानक काढली रॅली

संगमनेर / प्रतिनिधी —

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर टिपू सुलतानची तुलना केल्यामुळे संगमनेर बसस्थानक परिसरात सोमवारी (दि. १६) आमदार अमोल खताळ आणि शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सपकाळ यांची प्रतिमा पायदळी तुडवत जाहीर निषेध केला.

मालेगाव महापालिकेत काँग्रेसचा उपमहापौर झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यालयात टिपू सुलतान यांचा फोटो लावला आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज व टिपू सुलतान हे समकक्ष होते असे वादग्रस्त विधान केल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप केला. या पार्श्वभूमीवर शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “छत्रपती संभाजी महाराज की जय”, “जय भवानी जय शिवाजी”, तसेच “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

आंदोलनादरम्यान सपकाळ यांची प्रतिमा पायदळी तुडवून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी नीलम खताळ, भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, शिवसेना शहराध्यक्ष विनोद सूर्यवंशी, युवासेना जिल्हा उपाध्यक्ष सौरभ देशमुख, तालुकाध्यक्ष सुशील शेवाळे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, संगीता पुंड आदींनी संतप्त भावना व्यक्त केल्या. या आंदोलनात आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, दीपाली वाव्हळ, मेघना जेधे, अजित जाधव, प्रवीण कर्पे, सीताराम पानसरे, सनी धारणकर, कृष्णा हासे, तुषार ठाकूर, शशांक नामन, विकास पुंड, प्रवीण दिड्डी, मुकेश मुर्तडक, अवधूत आहेर, वरद बागुल, महेश मांडेकर, भारत गवळी, आशिष कानवडे, संकेत खुळे, लाला दायमा, भैय्या सातपुते, संदेश देशमुख, सुरेश लांडगे, मुकेश मुर्तडक, अनिल चव्हाण यांच्यासह शिवसेना महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!