अकोलेत कुंटणखाण्यावर छापा !… 

हॉटेल संकेत बार अँड लॉज – शेकईवाडी येथे अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाची कारवाई 

 एकास अटक – एका महिलेची सुटका 

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

अकोले तालुक्यातील शेकईवाडी येथील हॉटेल संकेत बार अँड लॉज या ठिकाणी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने छापा टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्या एका महिलेची सुटका केली असून एका आरोपीस अटक केली आहे. 

हॉटेल संकेत बार अँड लॉज चा मॅनेजर सुनील शांताराम शिंदे (वय 45 वर्ष, राहणार शेकईवाडी, तालुका अकोले) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

महिलांकडून स्वतःच्या आर्थिक फायदा करता तसेच मुलींना पैशाचे आमिष देऊन देह व्यापारास प्रवृत्त करून सदर हॉटेल लॉजिंग वर जागा उपलब्ध करण्यात येऊन त्यांच्याकडून कुंटणखाना (वेश्याव्यवसाय) चालवीत असल्याची, वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षकांना समजल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल दादासाहेब लोंढे, पोलीस नाईक संदीप दरंदले पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र बिरदवडे, पोलीस कॉन्स्टेबल अशोक गाडे यांच्या पथकाने अकोले पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची मदत घेऊन सदर ठिकाणी छापा टाकला.

या ठिकाणी डमी ग्राहक पाठवून खात्री केली असता लॉजच्या रूम नंबर दोन मध्ये एक महिला मिळवून आली. सदर महिलेकडे विचारपूस केली असता त्या महिलेने हॉटेलचे मॅनेजर माझ्याकडून वेश्याव्यवसाय करून ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यामधून मला काही पैसे देतात व माझ्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतात अशी माहिती दिली.

पोलीस कॉन्स्टेबल अशोक शशिकांत गाडे यांच्या फिर्यादीवरून अकोले पोलीस स्टेशन मध्ये स्त्रिया व मुलींच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अकोले पोलीस स्टेशन करत आहे. 

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!