विविधरंगी फुलांनी सजला हॅपी हायवे !
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतील हॅपी हायवे ठरला ट्रेडमार्क
संगमनेर | प्रतिनिधी —
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बस स्थानक या “हॅपी हायवे” वरील विविध रंगीबेरंगी फुले प्रवाशांचे लक्ष वेधून घेत असून हा हॅपी हायवे रस्त्यांसाठी ट्रेडमार्क ठरला आहे.

संगमनेर बस स्थानक ते इंजिनिअरिंग कॉलेज दरम्यान लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून चौपदरीकरण असलेला हॅपी हायवे हा मजबूत कामासाठी ट्रेडमार्क ठरला आहे. या 9 किलोमीटर रस्त्याचे काम हे अत्यंत मजबूत झाली असून रस्त्याच्या मध्यभागी डिव्हायडरवर रंगीबेरंगी फुलांसह आकर्षक झाडे लावण्यात आली आहे. गुलाबी, पिवळा ,सफेद, लाल अशा विविधरंगी फुलांनी संपूर्ण रस्ता अत्यंत आकर्षक आणि सुंदर दिसत असून तो प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला असलेल्या पादचारी मार्गाच्या बाजूनेही विविध वृक्षवल्लीमुळे हा रस्ता अत्यंत सुंदर दिसत आहे.

मध्यंतरीच्या काळामध्ये या रस्त्याकडे अत्यंत दुर्लक्ष झाले होते. याचबरोबर अनाधिकृत फ्लेक्स लोंबकळत होते. याबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. आता मात्र संगमनेर सेवा समितीने ठाम निर्णय घेऊन फ्लेक्स बंदी केली असल्याने नागरिक आनंदी आहे.
याचबरोबर नगरपालिकेच्या निकालाच्या दिवशी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी नवीन नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना रस्त्याच्या साफसफाई सह दुभाजकांमध्ये असलेल्या फुलांच्या संगोपनासाठी लक्ष देण्यासाठी सुचवले यानुसार संपूर्ण रस्त्यावरील फुलांचे पाणी मारणे व काळजी घेणे सुरू आहे. संगमनेर बस स्थानकापासून इंजिनिअरिंग कॉलेज पर्यंत विविध महाविद्यालय या रस्त्यावर असून युवक व विद्यार्थ्यांसाठी येण्या-जाण्याचा हा महत्त्वाचा रस्ता आहे. आता हा रस्ता तरुणांसाठी सेल्फी पॉइंट ठरत आहे. कॉलेज रोड म्हणून ओळख असलेला हा रस्ता संगमनेरचा लक्ष्मी रोड म्हणूनही लोकप्रिय झाला आहे.
