राजुर अकोले परिसरात विद्युत रोहित्रामधून कॉपर चोरी करणारी टोळी जेरबंद
15 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
राजुर अकोले परिसरात विद्युत रोहेत्रांमधून वारंवार कॉपरची चोर चोरी होत असल्याच्या घटना घडत होत्या. यावर आळा बसविण्यासाठी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तातडीने शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. एलसीबीच्या पथकाने व्यवसायिक आणि तांत्रिक तपासाच्या सहकार्याने कॉपर चोरी करणारी टोळी पकडली आहे.

अशा प्रकारच्या चोरी करणाऱ्या मधला एक आरोपी नारायणगाव परिसरात असल्याची खबर पथकाला लागल्यानंतर नारायणगाव परिसरात पथकाने गुप्तपणे शोध मोहीम सुरू केली असता त्यांना हवा असलेला आरोपी सुखरुप सुखदेव नांगरे (रा. हिवरे तर्फे, जि. पुणे) हा मिळून आला.
ताब्यात घेतलेल्या आरोपी नांगरे याच्याकडे कसून चौकशी केली असता सदर गुन्हे त्याने आणि त्याच्या साथीदारांनी केले असल्याचे उघडकीस आले. असून चोरी चोरलेला मुद्देमाल पुणे येथील भंगाराच्या दुकानात विक्री केला असल्याचे समोर आले.

पोलीस पथकाने आरोपी सुखरूप नांगरे यासह 2) सागर शिवराम जाधव (रा. ठाकरवाडी, महाळुंगे पडवळ, ता. आंबेगांव, जि. पुणे) 3) शैलेश बाळु पारधी (रा. ठाकरवाडी, महाळुंगे पडवळ, ता. आंबेगांव, जि. पुणे) 4) मोहंमद तल्हा मोहंमद जुबेर (रा. वाल्हेकरवाडी, जि. पुणे) यांना ताब्यात घेतले. 5) भास्कर केवळ (पुर्ण नांव माहित नाही) (रा. निमदरी, ता. जुन्नर, जि. पुणे) 6) सुनिल खंडागळे (रा. जवळके, ता. खेड, जि. पुणे) हे दोन आरोपी सापडले नाहीत.
ताब्यातील आरोपींकडून 15,65,000/- रुपये त्यामध्ये 65,000/- रुपये किमतीचे कॉपर, 15,00,000/- रुपये किमतीची कॉपर चोरी करतेवेळी वापरलेली इनोव्हा कार क्रमांक एम.एच. 12 ई. एक्स. 4340 असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
अ. क्र. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम
1 राजुर, जि. अहिल्यानगर 433/2025 बी. एन.एस. कलम 303(2), 324(4)
2 राजुर, जि. अहिल्यानगर 445/2025 बी. एन.एस. कलम 303(2), 324(4)
3 शिरुर जि. पुणे 909/2025 बी. एन.एस. कलम 324(4) सह विद्युत अधिनियम कलम 136 प्रमाणे
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार, विजय पवार, संतोष खैरे, गणेश लोंढे, फुरकान शेख, अमृत आढाव, योगेश कर्डीले, महादेव भांड यांच्या पथकाने केली आहे.
