वाहतूक पोलिसांनी किंवा अधिकार्‍यांनी स्वतःच्या खासगी मोबाईल मध्ये ई चलनाचा फोटो काढल्यास शिस्तभंगाची कारवाई !

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

वाहतूक नियमन आणि नियंत्रण करताना अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या खासगी मोबाईल फोन मधून ई चलनाचा वाहनांचा फोटो काढून त्याचबरोबर सोयीनुसार वेळ टाकली जात असल्याने इ चलनाचा फोटो खासगी मोबाईल मध्ये काढणाऱ्या अधिकाऱ्यावर आणि कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश वाहतूक अपर पोलीस महासंचालक प्रदीप साळुंके यांनी दिले आहेत.

या संदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेश पत्रकात म्हटले आहे की, वाहतुकीचे नियमन करण्यासाठी नेमलेले वाहतुक पोलीस अधिकारी/ अंमलदार हे त्यांचे खासगी मोबाईलद्वारे एकाच वेळी मोठया संख्येने वाहनांचे फोटो काढून ते सोयीनुसार ई चलान प्रणालीमध्ये अपलोड करून चुकीचे चलान देतात. त्याबाबत परिवहन मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

या कार्यालयाकडून ई चलानची कारवाई करताना स्वतःचे खासगी मोबाईल फोनचा वापर न करणेबाबत उपरोक्त यापुर्वीच आदेशीत करण्यात आले होते. परंतु असे निदर्शनास आले आहे की, अद्यापही काही पोलीस घटकातील पोलीस अधिकारी / अंमलदार हे स्वतःच्या खाजगी मोबाईल फोनद्वारे फोटो काढून वास्तविक वेळ (real time) सोडून, ते सोयीनुसार ई चलान प्रणालीमध्ये त्यांचे मोबाईलमधील फोटोचा वापर करून चुकीच्या पध्दतीने चलान जनरेट करतात. अशाप्रकारे खासगी मोबाईलद्वारे फोटो काढून सोयीनुसार ई चलान करताना पोलीस अधिकारी/ अंमलदार निदर्शनास आल्यास, त्यांचेविरुध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात यावी.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!