धरण परिसरात गणेश विसर्जनास बंदी ! पर्यायी व्यवस्था वापरण्याचे आवाहन

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

जलसंपदा विभागाच्या धरणांमध्ये व जलाशयात गणेश विसर्जन करू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी नागरिकांना केले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात अनेक नागरिक विसर्जनासाठी धरणांमध्ये येतात. या वेळी मूर्ती व निर्माल्यामुळे पाणी प्रदूषित होते. धरणातील पाणी खोल असल्याने अनेकदा अपघात होऊन जीवितहानीही झाली आहे. शिवाय लगतच्या भागात ध्वनी व वायुप्रदूषणाच्या तक्रारी ग्रामपंचायतींनी केल्या आहेत.

धरणातील पाणी गावांमध्ये पिण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे प्रदूषण झाल्यास आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. तसेच धरण सुरक्षेवर व पुरनियंत्रण व्यवस्थेवरही परिणाम होतो. यामुळे नागरिकांनी धरण परिसर टाळून नगरपालिकांनी किंवा ग्रामपंचायतींनी केलेल्या पर्यायी विसर्जन व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!