अवैध धंदे निदर्शनास येतील तेथील प्रभारी अधिकाऱ्यावर कारवाई करणार — पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे

पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध सूचना…

प्रतिनिधी दिनांक 18

अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून या बैठकीमध्ये त्यांनी विविध कडक सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर कारवाई करून अवैध धंदे तात्काळ बंद करावेत असे स्पष्ट बजावले आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याचे निदर्शनास येईल अशा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशाराही या बैठकीत पोलीस अधीक्षक घार्गे यांनी दिला आहे.

मंगळवारी (दिनांक 17) पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी दुरदृश्य प्रणालीव्दारे (व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे) अहिल्यानगर जिल्हयातील प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेवून, गुन्ह्यांची वेळेत निर्गती करणे, अवैध धंद्याचे उच्चाटन करण्याबाबत सर्व अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे, प्रभारी अधिकारी यांना सक्त कारवाईबाबत आदेश दिलेले आहेत.

दाखल असलेल्या प्रलंबित गुन्ह्यांचा तात्काळ योग्यतो तपास करुन, गुन्ह्यांची निर्गती करणे आणि पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेवून, योग्यती कायदेशिर कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत. विशेषत: शरिरीराविरुध्द गुन्हे करणाऱ्या आरोपींवर प्रतिबंधक कारवाई करणेबाबत विशेष सुचना देण्यात आल्या आहेत.

अहिल्यानगर जिल्हा हद्दीत कोठेही अवैध धंदे ( उदा. अवैध गुटखा/ सुगंधी तबांखु विक्रीे, गोमांस विक्री, अवैध दारु/ गांजा/ ड्रग्स विक्री, अवैध वाळु/ गौणखनिज उपसा व विक्री, अवैध हत्यार विक्री व बाळगणे, अवैध पेट्रोलियम पदार्थ विक्री, अवैध वाहतुक, जुगार/ बिंगो/ ऑनलाईन जुगार इ., वाहन चोरी व विक्री तसेच महिला व बाल यांचे अनुषंगाने अनैतिक मानवी तस्करी, पिटा व इत्यादी ) अशा प्रकारचे अवैध धंदयाचे 100% समूळ उच्चाटन करावे. ज्या ठिकाणी अवैध धंदे चालू आहेत, अशा ठिकाणी सत्वर छापे टाकून अवैध धंदयाचे समूळ उच्चाटन करावे. नमुद कारवाई केलेल्या ठिकाणी नियमीत भेट देऊन वारंवारं केसेस कराव्यात.अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांना कायदेशीर व्यवसाय करण्या बाबबतचे समुपदेशन करावे.

प्रतिबंधात्मक कारवाई करुन, सराईत गुन्हे करणारे गुंड / गुन्हेगारांविरुध्द आपण स्वत: वैयक्तिक लक्ष घालून कडक कारदेशिर कारवाई करुन, अवैध धंदयांचे पुर्णत: उच्चाटन करावे अशा सुचना दिलेल्या आहेत. दिलेल्या सुचनाप्रमाणे केलेल्या कारवाईचा अहवाल प्रत्येक मासिक गुन्हे आढावा बैठकीमध्ये पोलीस अधीक्षक हे स्वत:घेणार असल्याचे सांगितले आहे.

पोलीस अधीक्षक यांनी नेमलेल्या विशेष पथकाने पोलीस ठाणे हद्दिमध्ये छापे टाकले असता, कोणत्याही प्रकारचा अवैध धंदा ज्या पोलीस ठाणे हद्दीमध्ये निर्देशनास येईल, त्यांस संबंधीत पो.ठाणेचे प्रभारी अधिकारी हे जबादार राहातील व त्यांच्या विरुध्द शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे बजावण्यात आले आहे.

सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना पोलीस ठाणे हद्दीत कोणतेही अवैध धंदे सुरु होणार नाहीत, याची दक्षता घेणेबाबतच्या सक्त सुचना दिलेल्या आहेत, तसेच पोलीस अधीक्षक यांनी नियुक्त केलेले विशेष पथक कार्यरत राहिल. असे ही स्पष्ट करण्यात आले आहे

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!