शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षकपदी ममता सिंग यांची नियुक्ती 

खर्च पथकांच्या कामकाजाचा आढावा

प्रतिनिधी —

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता भारत निवडणूक आयोगाने उमेदवार खर्च नियंत्रणासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघा करिता निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून भारतीय महसूल सेवेतील अधिकारी ममता सिंग यांची नियुक्ती केली आहे.

निवडणूक खर्च निरीक्षक ममता सिंग यांचे १७ एप्रिल २०२४ रोजी शिर्डी लोकसभा मतदार संघात आगमन झाले आहे. त्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवणार आहेत. त्यांचे कार्यालय शिर्डी शासकीय विश्रामगृह येथे असणार आहे. तर श्रीमती ममता सिंग यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९३०७९२९९६३ हा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून संगमनेर लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, १७ एप्रिल रोजी त्यांचे शिर्डी येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक विधानसभानिहाय नेमणूक करण्यात आलेले सहायक खर्च निरीक्षक तसेच निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील सर्व तपासणी पथकांच्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!