आमदार थोरात यांच्या मागणीमुळे निळवंडे  कालव्याचे आवर्तन वाढले

प्रतिनिधी —

निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून सुरू असलेले आवर्तन वाढवून दुष्काळी भागातील जास्तीत जास्त गावांमधील शेतकऱ्यांना पाणी मिळावे अशी मागणी निळवंडे धरणाचे व कालव्यांचे निर्माते जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांनी केल्यानंतर निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे आवर्तन वाढवले असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशी माहिती आमदार थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.

निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून सध्या आवर्तन सुरू आहे. यामधून दुष्काळी भागातील अनेक गावांमधील बंधारे भरून दिले जात आहे. मात्र दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांची पाण्याची वाढती  मागणी यामुळे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा या धरणाचे निर्माते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकारकडे आवर्तन वाढवणे बाबत आग्रही मागणी केली होती.

अनेक अडचणींवर मात करून निळवंडे धरण व कालव्यांची कामे आमदार थोरात यांनी पूर्ण केली २०२२ ऑक्टोबर मध्येच उजव्या व डाव्या कालव्यातून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले याबाबत कोरोना काळातही बैठका घेऊन काम सुरू ठेवले. मात्र सरकार बदलले संपूर्ण काम पूर्ण होते. मात्र फक्त श्रेयवादासाठी उद्घाटन थांबवल्याने आमदार थोरात यांनी मेमध्ये डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. यानंतर मे महिन्यामध्ये पाण्याची चाचणी घेण्यात आली. सध्या डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू असून उजव्या कालव्याचे काम अपूर्ण असतानाही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा घाट घातला गेला .खरे तर अपूर्ण अवस्थेत  पंतप्रधान महोदयांच्या हस्ते उद्घाटन करणे अत्यंत चुकीचे आहे. अशी शेतकऱ्यांची भावना आहे .

यानंतर डाव्या कालव्यातून आवर्तन सुरू आहे मात्र अनेकांना पाणी मिळाले नसल्याने हे आवर्तन वाढवून मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. यानंतर आमदार थोरात यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री , पालकमंत्री यांना पत्र लिहून आवर्तन वाढवणे बाबत मागणी केली. यानंतर डाव्या कालव्याचे आवर्तन वाढवण्यात आले आहे.

यावर्षी सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळी जाहीर करावी अशी मागणी ही मा  कृषिमंत्री आमदार थोरात यांनी सरकारकडे केली आहे. असे पत्रकात म्हटले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!