सरकारी शाळा बंदीच्या निषेधार्थ शिक्षण मंत्र्यांना पाठवला काळा आकाश कंदील !

प्रतिनिधी —

शाळा बंदीच्या निषेधार्थ  शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व राज्य सरकार यांना छात्रभारती संघटनेने काळा आकाश कंदील संगमनेर पोस्ट ऑफिस  मार्फत पाठवला आहे.

राज्य सरकारने महाराष्ट्र भरातील १५ हजार  सरकारी शाळा बंद करायचा निर्णय घेतला आहे. व ६५ हजार पेक्षा जास्त सरकारी शाळा खासगी कंपन्याना दत्तक देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी शाळा बंदीचा निर्णय राज्य सरकारने मागे घ्यायला हवा. सरकारी शाळा बंद झाल्या तर गोर गरीब जनतेचे शिक्षण बंद होईल.

शाळा बंद होणे म्हणजे मोफत मिळणारे शिक्षण बंद करायचा सरकारचा डाव आहे. छात्रभारतीने या निणार्याचा निषेध म्हणून दिवाळी सारख्या प्रकाश मय उत्सवात सरकारला काळा आकाश कंदील पाठवून राज्य सरकार व शिक्षणमंत्री यांचा निषेध केला आहे.

यावेळी छात्रभारतीचे राज्य कार्यवाह अनिकेत घुले, सहसंघटक गणेश जोंधळे, जिल्हा अध्यक्ष राहुल जऱ्हाड, राम अरगडे, वैष्णवी भोईर, ओंकार अभंग, ईश्वरी गुंजाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!