मानाच्या सोमेश्वर मित्र मंडळ रंगार गल्ली श्री गणेशाची पूजा आणि आरती नंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात !
आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाली पूजा
प्रतिनिधी —
श्री सोमेश्वर मित्र मंडळ रंगार गल्ली मानाच्या पहिल्या गणपतीची आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पूजा आणि आरती करून संगमनेरच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळी सुरुवात झाली आहे.

यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने, तहसीलदार धीरज मांजरे, प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, मनीष मालपाणी, सोमेश्वर मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

ढोल ताशांच्या गजरात, पारंपारिक खेळांची प्रात्यक्षिके करीत आणि आनंदाने ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती निघाले गावाला चैन पडेना जीवाला’ अशा पारंपारिक घोषणा देत विसर्जन मिरवणूकीला सुरवात झाली आहे.

या मिरवणुकीबरोबरच शहरातल्या मुख्य मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. रंगार गल्ली, चंद्रशेखर चौक, नेहरू चौक, तेली खुंट, सय्यद बाबा चौक, गवंडीपुरा, मेन रोड, चावडी, माळीवाडा, नगरपालिका मार्गे ही शहराची भव्य दिव्य मिरवणूक मार्गस्थ होणार आहे.

विसर्जन मिरवणूक शांततेत आणि आनंदात पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घेतली असून विविध उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत.

