राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत ३ मिनीटात १०० गणिते सोडविण्याचा संगमनेरच्या विद्यार्थ्यांचाअदभुत विक्रम
प्रतिनिधी —
संगमनेर येथे राज्यस्तरीय अबॅकस व मानसिक अंकगणित या विषयाच्या स्पर्धेत ३ मिनीटात १०० गणिते सोडविण्याचा येथील देवांग क्रिएशनच्या विद्यार्थ्यांनी अदभुत विक्रम केला. साऊथ कोरिया येथून जागतिक अबॅकस स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याप्रसंगी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

मालपाणी हेल्थ क्लब या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते व रोटरी आय केअर ट्रस्टचे विश्वस्त सुनील कडलग, डॉ. भानुदास जी. डेरे इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या प्राचार्या रेखा पवार आणि देवांग क्रिएशनच्या संचालिका सोनाली डोखे उपस्थित होत्या. या स्पर्धांमध्ये अमरावती, सातारा, बदलापूर, मुंबई, पुणे, वाकड, नाशिक अशा विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

देवांग क्रिएशन्सकडून आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत खालील विद्यार्थ्यांनी यश मिळविले. देवांग लंकेश पठाडे, आरंभ निलेश शिंदे, पार्थ बाबुराव खेमनर, काव्या विशाल नेहे, कर्तव्य अजित नेहे, प्रणय योगेशकुमार लिल्हारे, अन्वेशा संजय चौरे, आराध्या चंदन बाप्ते या विद्यार्थ्यांनी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा पुरस्कार पटकावला.

सेजॉन्ग युनिव्हर्सिटी संभाषण केंद्र, गुंजा डोंग सोल दक्षिण कोरियामध्ये उज्ज्वल यश प्राप्त करणारे आरंभ शिंदे, आरोही कालडा, सृष्टी घोडेकर, मनीष कोहकडे, तन्वी कोष्टी यांना सुनिल कडलग, प्राचार्या रेखा पवार व देवांग क्रिएशन्सच्या संस्थापिका सोनाली लंकेश पठाडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ८ वी पातळी पूर्ण करून अंकगणित विषयात विशेष कामगिरी करणारे विद्यार्थी व शिक्षक यांना पदवी प्रदान समारंभात पदवी प्रदान करण्यात आली. तसेच २०२३ च्या जागतिक अबॅकस स्पर्धेसाठी पामा इंडीयाचे संस्थापक आबाजी काळे यांच्या व्दारे निवडलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका ललिता थोरात, प्रिती सोनवणे, अदिती कासार, अंजली वैष्णव, सुप्रिया इंदिकर, वर्षा पुंड, कल्पना शेवाळे, रोहिनी बेल्हेकर, स्मिता वर्पे, प्रतिभा बेलुरे, प्रणिता मंडलिक, रत्ना भांड, मंगल कानवडे या विविध जिल्ह्यांमधून आलेल्या देवांग क्रिएशन्सच्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माया परदेशी यांनी तर आभार प्रदर्शन अदिती कासार यांनी केले.

