‘तक्रार का घेतली’ म्हणत महिलेचा पोलीस ठाण्यातच स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत !
प्रतिनिधी —
आपल्या विरुद्ध क्रॉस कंप्लेंट देणाऱ्या महिलेची तक्रार का लिहून घेता असा असा सवाल करीत आणि आरडाओरडा करत, पोलिसांवर दबाव आणत स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न एका महिलेने केला असल्याचे घटना समोर आली आहे ही घटना अश्विनी पोलीस ठाण्यात (तालुका संगमनेर) घडली आहे.

सपना स्वप्निल सापनर व विकास अशोक मदने (दोन्ही रा. आश्वी बुद्रुक, ता. संगमनेर) यांच्या आश्वी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणि आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी सकाळी सपना सापनर या महिलेने आश्वी पोलिस ठाणे येथे पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दुपारच्या सुमारास अलका बरकडे ही महिला गुन्हा दाखल करण्यासाठी आश्वी पोलीस ठाणे येथे आली असता सपना सापनर या महिलेने आरडाओरडा करत त्या महिलेची तक्रार लिहून घेण्यास अडथळा आणत पोलीस ठाण्यासमोर अंगावर पेट्रोल टाकून आत्मदाह करण्याचा प्रयत्न केल्याने या महिले विरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आश्वी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि. १९ जून रोजी सकाळी सपना स्वप्निल सापनर (रा. आश्वी बुद्रुक) या या महिलेच्या फिर्यादीवरून गणेश मच्छिंद्र माने, शुभम रामभाऊ बरकडे, छाया सखाराम जऱ्हाड, रामभाऊ कारभारी बरकडे, अलका रामभाऊ बरकडे व सखाराम भिवा जऱ्हाड यांचे विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नबंर १४३/२०२३ नुसार भादंवी कलम ३५४, ३२३, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

दुपारी २ विजेच्या सुमारास अलका रामभाऊ बरकडे (वय -४५, रा. कुभांरवाडी वरंवडी, हल्ली रा. मांची रोड, आश्वी बुद्रुक, ता. संगमनेर) ही महिला आश्वी पोलीस ठाण्यात सपना सापनर हिच्या आई – वडिलाविरूध्द तक्रांर देण्यासाठी आली होती. अलका बरकडे यांनी सांगितल्याप्रमाणे महिला पोलीस कर्मचारी ताराबाई चांडे या फिर्याद लिहुन घेत होत्या. यावेळी सपना सापनर ही महिला पोलीस ठाण्यात आली व ‘खोटी तक्रांर का घेता, आमच्या विरुद्ध फिर्याद घेऊ नका ’ असे म्हणत आरडाओरडा सुरु करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

तर आमचे कोणी वाकडे करणार नसल्याचे म्हणत मिडीयात जाण्याची धमकी दिली. यावेळी पोलीस ठाण्यासमोर उभा असलेला तिचा भाऊ विकास अशोक मदने याने पेट्रोलची बाटली सपना सापनर आणून दिली व तुम्ही जर अलका बरकडे हिची तक्रांर घेतली तर अंगावर पेट्रोल ओतून मी व माझा भाऊ आत्महत्या करु असे म्हणत अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत महिला पोलीस कर्मचारी चांडे, खेमनर तसेच पोलीस काॅस्टेबल काळे यांनी तात्काळ पळत जाऊन पेट्रोलची बाटली हिसकावुन घेत पुढील अनर्थ टाळला आहे.

दरम्यान आश्वी पोलीस ठाण्यात आरोपी सपना स्वप्निल सापनर व विकास अशोक मदने (दोन्ही रा. आश्वी बुद्रुक, ता. संगमनेर) यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नबंर १४५/२०२३ नुसार भादंवी कलम ३५३, ३०९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक संतोष भंडारे हे स्वतः या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे.

आश्वी पोलीस ठाणे परिसरात सोमवारी घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी असून पोलीस प्रशासन हे नागरीकांच्या संरक्षणासाठी असते यांचा विसर पडल्यामुळेचं पोलीसांच्या कामात अडथळा आणण्याबरोबरचं अत्यंत निंदनीय कृत्य करण्याचे धाडस करण्यात आले. असे बेजबाबदार प्रकार पोलीस प्रशासन खपवून घेणार नाही. तसेच भविष्यात फिर्याद दाखल करण्यासाठी आलेल्या नागरीकानी दहशत निर्माण करत दबावतंत्राचा वापर केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, आश्वी पोलीस ठाणे

